Health Benefits Of Jaggery In Marathi | सेंद्रिय गुळ खाण्याचे फायदे |

आज आपण जे जाणणार आहोत, ते संपूर्ण संशोधन स्व. डॉ. राजीव दीक्षित ह्यांचे आहे.

प्रथम आपण गुळ कसा तयार होतो ते पाहू.

ऊसाच्या रसापासून गुळ तयार करणे हे भारतीय शास्त्र आहे. ऊसाच्या रसात भरपूर प्रमाणात फॉस्फरस असते. हा रस गरम करुन त्यापासून गुळ बनवला जातो. गुळामध्ये ऊसाच्या रसापेक्षा श्रेष्ठ प्रतीचे फॉस्फरस निर्माण होते. ऊसाच्या रसापासून गुळ तयार होत असताना फॉस्फोरस वाढते. ही भारतीय शास्त्राची किमया आहे. तर साखर कारखान्यात ऊसाच्या रसापासून गोरी साखर बनताना ऊसाच्या रसातील मूलतः अस्तित्वात असलेले फॉस्फोरस नष्ट होते.

काकवी ही गूळाच्या आधीची अवस्था आहे. पातळ अवस्थेतील गूळ म्हणजेच काकवी होय. काकवी मध्ये गुळापेक्षा उच्च प्रतीचा फॉस्फोरस आहे.

शरीरात गुळाचे पचन कसे होते ते पाहू.

१) गुळामध्ये फॉस्फोरस असल्याने गुळ हा क्षारीय आहे. त्यामुळे त्याचे पचनही लवकर होते. तसेच गुळासोबत आपण ज्या ज्या गोष्टी खातो त्या गोष्टी पचवायला ही गुळ मदत करतो.

२) गुळ शरीरात फॉस्फोरस सारख्या आवश्यक तत्वांचा साठा वाढवते. त्यामुळे शरीरातील मांसपेशी, हाडे, दात ह्या घटकांची वाढ सुयोग्य होण्यास मदतच होते.

३) गुळ सेवनाने जठरात क्षार तयार होतो. परिणामी जठरातील आम्लता संतुलित रहाते.त्यामुळे रक्तातील आम्लताही वाढत नाही व रक्त शुद्ध रहाते. शरीरात दोष साठत नाहीत.

४) खात्रीपूर्वक बनवलेल्या सेंद्रिय गुळामध्ये कोणतेही केमिकल नसतात. त्यामुळे यकृत व मूत्रपिंडावरही ताण येत नाही.

गुळाचे उपयोग (Health Benefits Of Jaggery |
थंडीत गूळ खाण्याचे फायदे
)

आयुर्वेदात वाग्भट संहितेत कफदोषाचे शमन करण्यासाठी गुळ / मध हे दोन घटक सर्वश्रेष्ठ सांगितले आहेत.

आधुनिक शास्त्रानुसार पाहता शरीरातील फॉस्फोरस तत्व कमी झाले असता कफदोष बिघडतो.

आपल्या आचार्यांनी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता आपल्या साधनेने आयुर्वेद ग्रंथ रचले.गुळातील क्षारीय तत्व ( फॉस्फोरस ) कफदोष कमी करण्यास मदत करतो.

साखर रोगप्रतिकारशक्ती कमी करते. तर गुळ रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.

गुळ खाण्याचे नियम पाहूया.

१) दही खाताना गुळ घालून खावे. म्हणजे दही बाधत नाही.नियमित दही सेवन करु नये.

२) दूधात मात्र गुळ घालून खाऊ नये. कारण दूध थंड गुणाचे आहे तर गुळ हा उष्ण आहे. दूध आणि गुळ एकत्र झाले की तो विरुध्द संयोग होतो. त्यातून शरीरात हानिकारक तत्व निर्माण होतात.केवळ दूध पिण्याची सवय मुलांना लावावी. दूध सेवन करण्याआधी किंवा नंतर गुळ खाऊ शकतो.

३) जे जे गोड पदार्थ करायचे ते गूळ घालून बनवू शकतो व जेवताना खाऊ शकतो. म्हणजे स्वादुपिंडावर ताण येत नाही गोडवाही चाखू शकतो.

तसेच ज्या गोड पदार्थात साखर घालायची आहे तिथे खाण्डसरी साखर अथवा पथरी खडीसाखर घालून बनवू शकतो.

अशी थोडीशी जागरूकता ठेऊन इथून पुढे गुळाचा – काकवीचा गोडवा चाखत पुन्हा एकदा आपण आपल्या मुलांसोबत तसेच नातवंडांसोबत बालपणात रममाण होऊयात!

सत्व राखून ठेवावे शुध्द

पदार्थ करावा युक्तीने बध्द

शास्त्राने केला सकल विचार

सुदृढ ठेवून आरोग्य मानवाचे

दूर ठेवावे सर्व आजार!

कला ही पाकशास्त्राची

देणगी पूर्वज आचार्यांची

आहारास जोड आयुर्वेदाची

जबाबदारी आपली सुदृढ पिढी घडवण्याची!