आता पडलेल्या थंडीमध्ये गारठा भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे विशेष करून स्नायूंना (Dry Skin in Winter )आखडलेपणा जास्त येतो. त्यामुळे अचानक स्नायूंचे दुखणे, सांधे आखडणे, मणके आखडणे अशा तक्रारी सर्रास दिसून येत असतात.
यासोबतच त्वचेला कोरडेपणा येणे, त्वचा विकार वाढणे, हातापायाला भेगा पडणे, मुळव्याध, सतत करट उठणे, कोरडा खोकला अशी इतर लक्षणे थंडीचा परिणाम म्हणून दिसून येत असतात.
या थंडीचा परिणाम शरीरावर फार होऊ नये यासाठी वाटीभर तिळाच्या तेलात पाव चमचा मीठ टाकून हे गरम करून रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी अंघोळीच्या पूर्वी अंगाला लावणे फार फायदेशीर ठरते.

त्वचा हे आपल्या शरीरातील सर्वात मोठे इंद्रिय आहे आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम त्वचा करत असते. अशा थंडीमुळे शरीरात वात फार वाढत असतो या तिळाच्या तेलाच्या साध्या उपायाने हा वाढलेला वात नियंत्रित राहू शकतो.
Moisturizer to Prevent Itchy Dry Skin in Winter:
यासोबत सकाळी अंघोळीवेळी गरम पाण्याचा शेक बसला म्हणजे शरीर आणखी हलके होते आणि वात नियंत्रित राहतो.
यासोबतच आहारामध्ये तुपाचा वापर शक्य होईल तितका जास्त करावा. म्हणजे आतूनही कोरडेपणा फार वाढणार नाही. तूप हे घरगुती केलेले असेल तरच जास्त वापरावे, त्याचाच फायदा चांगला होतो.