Benefits of Balguti in marathi| बाळगुटी | Benefits of Balguti for toddler

बाळगुटी

बाल्यावस्थेतील अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा आणि पारंपारिक असणारा असा घटक म्हणजे बाळगुटी‌ ! बाळगुटी (Benefits of Balguti for toddler) म्हणजे बालकांच्या आरोग्यासाठी तसेच विविध इतर शारीरिक तक्रारी साठी पारंपारिक पद्धतीने वापरली जाणारी औषधि द्रव्यांची योजनाच.

baby girl names in marathi starting with s

बाळगुटीचा मुख्य उद्देश बाळ गुटगुटीत तसेच निरोगी राहणे असून यामध्ये बालकांच्या तक्रारींनुसार औषधी द्रव्य दुधातून दगडी सहाणेवर उगाळून दिली जातात. साधारणता सव्वा महिन्यानंतर बालकांना बालगुटी आईच्या दुधात उगाळून दिली जाते.

Benefits of Balguti for toddler ,Benefits of Balguti in marathi

Benefits of Balguti in marathi

वास्तविक पाहता गुटी मुळे बालकांचे वजन – उंची वाढणे, तसेच बौद्धिक क्षमता वाढणे, माइल स्टोन म्हणजे पालथे पडणे, बसणे, रांगणे, बोलणे, चालणे या गोष्टी चांगल्या व लवकर होतात.

लहान बालकांना अपचन, पोटदुखी,जुलाब, उलटी, पोट साफ न होणे, ताप, खोकला, सर्दी, पडसे तसेच दात येतानाचा त्रास होऊ नये यासाठी लगेच औषधे न देता गुटी चा वापर केल्यास त्याचा फायदा होऊन वारंवार इंग्लिश औषध द्यावी लागत नाहीत.

Marathi Baby Girl Names

बाळगुटी कशी द्यावी

बऱ्याचदा बालरोग तज्ञ (ॲलोपॅथी डॉक्टर) बाळाला गुटी देऊ नका असे सांगतात याचे कारण म्हणजे गुटी देत असताना ठेवायची स्वच्छता व काळजी न घेतल्यामुळे बालकांना इन्फेक्शन होऊन जुलाब उलटी झालेले पाहायला मिळते. म्हणून गुटी देत असताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

गुटी देण्यासाठी लागणारी द्रव्ये उगळल्यानंतर स्वच्छ, कोरडी करून उन्हात सुकवून पावसाळ्याच्या दिवसात ऊन नसेल तर हेअर ड्रायर ने सुकवून एका लाकडी किंवा प्लॅस्टिक बॉक्समध्ये ठेवावी.

तसेच उगळण्यासाठी आईच्या अंगावरचे दूध घेत असताना स्वच्छते विषयक सर्व काळजी येणे गरजेचे आहे.

गुटी उगळण्यासाठी वापरली जाणारी सहाण दगडी मोठी व पसरट असणे अपेक्षित आहे.

त्याचबरोबर गुटी उगळल्यानंतर ते देण्यासाठी ज्या चमच्यामध्ये किंवा गोकर्ण (गुटी देण्याचे गाईच्या कानाच्या आकाराचे पात्र) मधून ते द्यायचे ते शक्यतो चांदीचे व स्वच्छ करून वापरावे.

चांदीचे नसेल तर स्टीलचे वापरण्यास हरकत नाही. गुटी उगाळताना बालकाच्या वयाच्या महिन्यानुसार गुटीतील द्रव्य उगळणे अपेक्षित असते उदा.

बाळ दोन महिन्याचे असल्यास गुटीतील औषधांचे दोन वेढे उगाळून घेणे अपेक्षित आहे.

तसेच सुंठी सारखे उष्ण व तिखट द्रव्य उगाळताना थोडे कमी प्रमाणात व काळजीपूर्वक उगाळून घ्यावे. त्याचप्रमाणे सागरगोटा, हिरडा, वेखंड यासारखी कठीण द्रव्य लगेच उगाळली जात नाहीत. म्हणून त्यांचे वेढे युक्तीने वाढवणे अपेक्षित आहे. बाळगुटी साठी लागणारी मुख्य औषधे पुढील प्रमाणे आहेत.

Balguti ingredients in marathi

सुंठहळकुंडवेखंड
कुडासागरगोटाडिकेमाली
मुरुडशेंगहिरडाबाळहिरडा
काकडशिंगीजेष्ठमधनागरमोथा
अतिविषाजायफळमायफळ
अश्वगंधाखारीकबदाम
बेहडापिंपळीसुवर्ण ( सोने )
Benefits of Balguti for toddler

हल्ली बाजारामध्ये रेडीमेड गुटी आलेली आहे . परंतु ती वापरणे तितकेसे संयुक्तिक नाही. कारण बाळाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या लक्षणानुसार गुटीतील द्रव्यांचे प्रमाण कमी-अधिक करणे गरजेचे असते. ते यामध्ये करता येणे शक्य नसते.

त्याचबरोबर रेडीमेड लिक्विड स्वरूपातील गुटी प्रिझर्वेटिव्ह अँड करून आयुर्वेदाचे सर्व नियमांना फाटा देऊन बनवली गेलेली आहे. त्यामुळे ती न वापरलेलीच बरी.

Marathi Baby Girl Names