प्रेशर कुकर – एक आभास अन्न शिजलेय असा

Side effects of pressure cooker, nutrient values of food cooked in pressure cooker, bad effects of pressure cooker on health, nutritional loos in pressure cooking

प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवले असता प्रत्यक्षात काय होते हे समजून घेऊयात.

कुकरमध्ये शिजवलेल्या पदार्थांचा प्रयोगशाळेत अभ्यास केला असता असे आढळले आहे – :

प्रेशर कुकर मध्ये शिजवलेल्या डाळीत केवळ १२% च पोषक घटक शिल्लक राहतात.

कुकरमध्ये पाण्याची वाफ होते व ती कोंडली जाते. शिट्टी लावल्यामुळे वरून वाफेचा दाब पदार्थांवर पडतो. त्यामुळे तो पदार्थ तुटतो व उकळला जातो. मऊ होतो आणि आपणाला पदार्थ शिजलाय असा भास होतो. खरंतर पदार्थ पूर्णतः शिजलेलाच नसतो.

पदार्थ योग्य रितीने शिजवणे का महत्त्वाचे आहे ते पाहू.

डाळी, कडधान्ये, तांदूळ, विविध भाज्या, गहू, ज्वारी इ.मधून आपणाला प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्धपदार्थ, विविध खनिज व जीवनसत्त्वे मिळतात. पदार्थ योग्य शिजला तर आपल्या शरीरातही त्याचे सहज पचन होते व त्यातील पोषकांश शरीरामध्ये शोषले जातात.

प्रेशर कुकर मध्ये अन्न पूर्णतः शिजतच नाही. तसेच त्यातील पोषकांशही नष्ट होतात. पदार्थ अपूर्ण शिजलेला असल्याने तो पचवण्यासाठी शरीरातील अग्निवर ताण येतो. पचनशक्ती कमी होते. त्यामुळे भविष्यात मधुमेह, दमा, स्थौल्य, वारंवार कफ होणे, जीवनावश्यक ( vitamins – minerals) पोषकत्त्वांची कमतरता इ. विविध आजार होतात.

डॉ. राजीवभाईंनी त्यांच्या डायबेटीस रुग्णांना प्रेशर कुकर न वापरता मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाण्यास सांगितले असता ७-८महिन्यात त्यांची रक्तातील साखर संतुलित झाली. पूर्वी सर्वच जेवण मातीच्या – लोखंडी – पीतळ इ. भांड्यात पूर्णतः शिजवले जात होते. प्रेशर कुकर नव्हता.

त्यामुळे आधीच्या पिढीला आजारही कमी होते. त्यांना जीवनसत्त्वांच्या गोळ्या, प्रोटीन पावडर इ. घेण्याची गरजच पडत नव्हती. त्यांची शारीरिक व मानसिक कार्यक्षमताही आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती.

निसर्गाचा महत्वाचा नियम समजूयात.

निसर्गात जो पदार्थ तयार होण्यास जितका वेळ लागला आहे तितका वेळ तो पदार्थ शिजण्यास लागतो. जमिनीतील विविध पोषक घटक शोषून कोणतेही धान्य, भाज्या, फळे, कडधान्ये तयार होतात. प्रत्येक घटक पूर्ण तयार होण्यास विशिष्ट कालावधी लागतो. उदा. चणाडाळ तयार होण्यास वेळ लागतो परिणामी तिला शिजण्यासही वेळ लागतो.

अन्नपदार्थ कुकरमध्ये शिजवल्याने आपणाला पदार्थातील संपूर्ण पोषकांश मिळत नाहीत. पदार्थ जबरदस्ती शिजवला जातो. तो शिजला आहे असा भास होतो. पण प्रत्यक्षात त्या पदार्थातील पोषकतत्व नष्ट झालेले असतात. जणूकाही मूळ निसर्गतः पोषकांशाने परिपूर्ण पदार्थावर प्रेशर कुकर खरच प्रेशर आणते आणि त्यातील जीवनावश्यक घटक नष्ट होतात. पदार्थ अपूर्ण शिजल्याने आपल्या पचनाशक्तीवरही ताण येतोय व भविष्यात लवकरच विविध आजार होऊ लागतात.

निसर्ग आजही आपणाला भरभरून देतोय पण जेवण बनवण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे आपण योग्य तो उपभोग घेऊ शकत नाही. आपण आपल्या मुलांसाठी खूप जागरूक असतो. परिपूर्ण षोषण व्हावे ह्यासाठी प्रत्येक पदार्थ जितका महत्वाचा आहे तितकेच महत्वाचे आहे तो पदार्थ आपण कसा तयार करतो.

“अन्न हे पूर्णब्रह्म!” असे आपण म्हणतो.

आपल्या मुलांच्या परिपूर्ण षोषणाची डोळसपणे जबाबदारी घेऊया. आपण इतके कष्ट करतो आणि मुलांना सर्व उपलब्ध करुन देतो. अन्नपदार्थ योग्य रितीने तयार केले तर खऱ्या अर्थाने आपल्या कष्टाचे सोने होईल मुलांच्या सुयोग्य षोषणरुपात!

पोषणमूल्य आहाराचे

मातीत उगवलेल्या धान्याचे

निसर्गतः असते सोन्याचे

कौशल्य जपावे शिजवण्याचे!

दबावाने तुटून जाणे

निसर्ग नियमाचे हेच सांगणे

अट्टाहासाने कुकरमध्ये शिजवणे

कणाकणातील सत्व गमावणे!

निसर्गाशी जपावा व्यवहार

मातीच देते आपणा आहार

मातीच्या भांड्याचा करुन वापर

आरोग्याला द्यावा आधार!