
शरीरावश्यक पाच धातु, विविध भांडी व दागिने
आपण आधीच्या लेखांमध्ये अॅल्युमिनियम व मातीच्या भांड्याविषयी पाहिले. आपणाला अनेकदा चांगली मातीची भांडी सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आपण अॅल्युमिनियमच्याच तव्यावर चपाती, भाकरी, रोटी, फुलके इ. करतोय.
नॉनस्टिक तव्यात डोसा व तळणीचे काम करतो. तसेच भाज्या,आमटी सुध्दा त्याच पातेल्यात करतो. आज आपण इतर धातूंपासून बनवलेल्या भांड्यांविषयी पाहूयात.
आपल्या शरीरावश्यक पाच प्रमुख धातु–:
१) लोह २) तांबे ३) पितळ ४) सोने ५) चांदी
ह्या सर्व घटकांची पूर्तता स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यातूनच निसर्गतः व्हावी अशी आपली परंपरागत भांड्यांची रचना केलेली होती. त्यामध्ये खूप मोठे विज्ञानच सामावलेले होते.
आपल्या देशात इतर भांडी विविध धातुंपासूनच बनवली गेली. तर तवा मात्र लोखंडाचाच बनवला गेला. ह्यासाठी चपाती, भाकरी इ. लोखंडी तव्यावरच बनवावे. ह्यासाठी अॅल्युमिनियम अथवा नॉनस्टिक भांडी वापरू नयेत. नॉनस्टिक अर्थात लोखंड किंवा अॅल्युमिनियम वर कार्बनचे आवरण केलेले असते.
कार्बन इतके हानिकारक आहे की शरीरातील वाढलेले कार्बनचे प्रमाण हे सुद्धा कॅन्सरचे एक कारण आहे. नॉनस्टिक भांड्यांमुळे आहारासोबत शरीरात कार्बनचे अणू जातात व ८-१०-१५ वर्षांत कॅन्सरच्या गाठी होण्याची पूर्ण शक्यता आहे. ह्यासाठी नॉनस्टिक भांडी वापरु नयेत.
चपाती, भाकरी इ. तसेच काही पदार्थ तळायचे असतील तर ते लोखंडी तवा अथवा कढई मध्येच करावेत. भाजीही लोखंडी कढईत बनवू शकतो. भात,खीर,आमटी,भाज्या इ. बनवण्यासाठी पितळ,तांबे,कासे तसेच मातीची भांडी बनली गेली. जेवणाची , जेवण वाढण्यासाठीची भांडी सोन्या-चांदीचीही बनवली गेली.
सोन्याचांदीचे गुणधर्म दागिन्यांच्या माध्यमातूनही प्राप्त होतात. कमरेपासूनच्या भागातील दागिने उदा. कमरपट्टा, पैंजण, जोडवी इ. विशेषतः चांदीपासून बनवले गेले. चांदीमुळे वायु संतुलित राहतो. तसेच नाभीपर्यंतचे दागिने उदा. बांगड्या, हार, कर्णफुले इ. सोन्यापासून बनवले. सोने शरीरातील अग्नि संतुलित ठेवतो. सोन्याची व चांदीची भांडी आपल्या देशात राजघराण्यात वापरली जायची.
परंतु भारतातील सर्वसामान्य व्यक्तीही सोने आहारात घेऊ शकते अशी व्यवस्था निसर्गाने केलेली आहे. भारतीय वंशाच्या देशी गाईच्या दूधात सुवर्णक्षार असतो. गाईच्या दुधाद्वारे भारतातील सर्वांना सुवर्णक्षार सहज प्राप्त होत होता. चांदी, तांबे, कासे, पितळ, लोखंड, बीड तसेच मातीच्या भांड्यापासून सहजच नैसर्गिक रूपामध्ये धातूंची पूर्तता शरीराला होते.
स्टील मात्र अगदीच मजबुरीमध्ये वापरावे. स्टीलही हानिकारकच आहे. लोखंडावर कार्बनचे आवरण चढल्यानंतरच स्टीलची निर्मिती होते. स्टीलची जी चकाकी आहे ती वास्तविक कार्बनचीच चकाकी आहे. त्यामुळे मजबुरीतच स्टील वापरावे.
स्टीलच्या अणूंची रचना इतकी कठीण असते की सामान्य तापमानात स्टीलचे कण विघटन होऊन अन्नात मिसळत नाहीत. त्यामुळे त्यातल्यात्यात स्टील अँल्युमिनियमपेक्षा सुरक्षित म्हणावे. परंतु १००% सुरक्षित नाही.
हे सर्व जाणता स्पष्ट होतेय आपल्या पारंपरिक भांड्यांच्या निर्मितीत सखोल वैज्ञानिक दृष्टिकोनच लपलेला आहे. आपले पारंपारिक सोन्याचांदीचे दागिने हे स्त्री-पुरुषांचे केवळ सौंदर्यच खुलवत नाहीत तर त्यांचे आरोग्यही खुलावतात.