अल्युमिनियम हा शरीरास अतिशय अपायकारक तसेच पचनास जड धातू आहे. ह्या धातूचे निर्विषीकरण (detoxification) शरीरात होत नाही. त्यामुळे ह्या धातूची विषारी तत्व हळूहळू शरीरात साठत जातात. परिणामी दमा, टीबी सारखे श्वसनविकार, पचनाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, कॅन्सर सारखे गंभीर आजारही होतात. आधुनिक शास्त्रामध्येही हा धातू निषिद्ध मानला आहे. जर्मन,स्टील,नॉनस्टिक भांडीही अपायकारकच आहेत.

अॅल्युमिनियम अथवा नॉनस्टिक भांडी वापरू नयेत. नॉनस्टिक अर्थात लोखंड किंवा अॅल्युमिनियम वर कार्बनचे आवरण केलेले असते. कार्बन इतके हानिकारक आहे की शरीरातील वाढलेले कार्बनचे प्रमाण हे सुद्धा कॅन्सरचे एक कारण आहे. नॉनस्टिक भांड्यांमुळे आहारासोबत शरीरात कार्बनचे अणू जातात व ८-१०-१५ वर्षांत कॅन्सरच्या गाठी होण्याची पूर्ण शक्यता आहे. ह्यासाठी नॉनस्टिक भांडी वापरु नयेत.
अॅल्युमिनियमचे दुष्परिणाम –
अॅल्युमिनियमचे अणू वजनाने जड असतात. तसेच हा धातु कमीतकमी तापमानात वितळतो. परिणामी अॅल्युमिनीयमचे अणू पदार्थ बनत असताना अन्नात मिसळतात. हे अणू आहारासोबत शरीरात शोषले गेले तर ते वजनाने जड असल्याने एकदा शरीरात गेले की कधीही शरीराबाहेर पडत नाहीत. तसेच असे कोणतेही औषध नाही जे हे अॅल्युमिनीयम शरीराबाहेर काढेल. ते कण शरीरातच साठून राहतात. आणि सर्वात प्रथम फुफ्फुसांना हानी पोहचवतात व नंतर इतर अवयवही बिघडतात.
आता वर्तमान महामारीच्या परिस्थितीत आपण सर्वजण रोगप्रतिकारशक्ती वाढावी असा विचार करतोय. आणि त्यामध्ये फुप्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी विविध उपाय करतोय. अॅल्युमिनियमविषयी जाणता आपली भांडी बदलणे किती गरजेचे आहे हे प्रकर्षाने पटेल.
अल्युमिनियमची भांडी भारतात कशी आली?
इंग्रज येण्यापूर्वी भारतात अल्युमिनियमची भांडी नव्हती. त्यांनी कैद्यांसाठी ही भारतात आणली. आपले क्रांतिकारक आजारी पडून त्यांचे आयुष्य कमी व्हावं हा त्यांचा दुष्ट हेतू होता. त्यामुळे पाणी, चहा, जेवण सगळ्यासाठी ते अल्युमिनियमची भांडीच देत. हळूहळू आपल्यातील अज्ञानामुळे ही भांडी आपल्या स्वयंपाकघरातही आली. स्वस्त असल्याने गरिबांच्या घरात तसेच सर्वच घरांमध्ये ह्या भांड्याचा अतिवापर झाला.

परिणामी आजार वाढले. अल्युमिनियम नंतर स्टील,जर्मन,नॉनस्टिक भांडीही भारतात आली. ही सर्वच भांडी स्वस्त , वजनाला हलकी, स्वच्छ करण्यास सोपी, लवकर तापतात त्यामुळे अन्न लवकर शिजते ह्या विविध कारणांमुळे सर्वत्र घरोघरी वापरली जाऊ लागली. पूर्वी भारतात तांबे, पितळ, लोखंड, कांसे, बीड अशा धातूंपासून भांडी बनवली जायची. आपणही अल्युमिनियमची भांडी बनवू शकलो असतो परंतु आपण ती बनवली नाहीत.
कारण ते आपल्या हिताचे नाही हे आपले पूर्वज जाणत होते. आधुनिकीकरणामुळे जीवन धावपळीचे झाले. चुलीची जागा स्टोव्ह,गॅस शेगडीने घेतली तसे एकेक भांड हळूहळू बदलत गेले. आता आपल्याला समजलं आहे तर परत आपण पाणी साठवणे, स्वयंपाक करणे ह्यासाठी मातीच्या भांड्याचा उपयोग करणे आरोग्यदायी ठरेल. तसेच तांबे, पितळ, बीड, लोखंडी इ.भांडीही वापरू शकतो.
आपले कुंभार महान शास्त्रज्ञच आहेत.
मडके, तवा, कढई, हंडी इत्यादी विविध भांडी बनविण्यासाठी विविध गुणधर्म असलेली माती लागते. अशी माती स्पर्शाने, पाहून ओळखणे व त्यापासून अचूक असे भांडे तयार करणे हे सखोल अनुभवाचे शास्त्र आहे. आपण पूर्वी मातीचीच भांडी वापरत होतो त्यामुळे कुंभारही साधनसंपन्न होते.
आपण भांडी बदलली आणि कुंभार बेरोजगार झाले. अर्थव्यवस्था ढासळली. मातीची भांडी फुटली तरी त्याचा पुन्हा उपयोग होतो. आपल्या आरोग्यासाठी कुंभारांचे योगदान पहाता आपण मातीच्या भांड्याचा जरूर स्वीकार करावा असेच मनोमन वाटते.
स्वयंपूर्ण व आरोग्यदायी भारत घडवण्यात आपण नक्कीच खारीचा वाटा उचलून सहकार्य करुयात.