फ्रिजचा आविष्कार कुठे व का झाला ते पाहुयात.
युरोप अमेरिकेत तापमान -४०ते+१५ डिग्रीपर्यंत पर्यंत असतं. तिथे भाज्या,फळे,धान्य वर्षभर पिकत नाहीत. ८-८महिने सूर्यप्रकाशही दिसत नाही. ऊनही पडत नाही. त्यामुळे अन्नपदार्थ टिकवण्यासाठीच्या गरजेतून फ्रिजचे संशोधन झाले.

तिथे विशिष्ट तापमानात अन्नपदार्थ व औषधांचा साठा करता येईल हा हेतू होता. तसेच तिथे रोजच्या रोज ताजे जेवणही बनवत नाहीत. आठवड्यातून एकदा दोनदाच बनवतात व नंतर गरम करून करून खातात अशी संस्कृती आहे. फ्रिजमधून १२ प्रकारचे CFC विषारीवायु बाहेर पडतात. फ्रिज व एअर कंडिशनर निसर्गाच्या विरोधात तापमान कमी करतात. त्यामध्ये क्लोरीन, फ्लोरिन व कार्बन ( CFC) हे ३ अतिशय घातक विषारीवायू बाहेर पडतात.
ह्या तीन वायूंच्या संयोगाने १२ प्रकारचे विषारीवायु तयार होतात. फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न-पाणी ह्या विषारी CFC वायुंच्या प्रभावामध्ये येते. अन्न झाकून ठेवले तरी ह्या वायूंचा दुष्परिणाम अन्नपदार्थावर होतोच. हळूहळू ह्या विषाचा परिणाम शरीरावर होतो.
भारतात फ्रिज चा प्रवेश कसा झाला.
अमेरिकन Calvinator कंपनीने फ्रिज भारतात आणला. अमेरिका युरोप मध्ये CFC वायूचे प्रमाण खूप वाढले. परिणामी ओझोन कमी झाला. वातावरणात ओझोन योग्य प्रमाणात नसेल तर आपण जिवंत राहू शकत नाही. सूर्यप्रकाशात अतिप्रखर अशी ultraviolet किरणे असतात.
जी ओझोन वायूच्या स्तरातून सृष्टिमध्ये प्रसारित होतात त्यामुळे ती सुसह्य होतात. ही अतिप्रखर किरणे प्रत्यक्ष त्वचेवर पडली तर त्वचा जळते,करपते, त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते असे त्यांच्या निरीक्षणात आले. फ्रिज, एअरकंडिशन मुळे CFC वायु मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो. ह्या वायूमुळे ध्रुवीय देशांतील ओझोन कमी झाला. तिथे उष्णता वाढली. बर्फ वितळला. नदीच्या पाण्याची पातळी वाढली. पूर येऊ लागले.
CFC चे प्रमाण वाढल्याने पुरसमस्या निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी वातावरणातील CFC चे प्रमाण कमी करण्याचे ठरविले. पण फ्रिज, एअरकंडिशनसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा कमी होऊ नये म्हणून त्यांचे आगमन आशियाई देशात झाले. जाहिरातींचा योग्य तो परिणाम भारतीयांच्या मानसिकतेवर झाला व घराघरात देव्हाऱ्याप्रमाणेच फ्रिजसाठी जागा झाली.
परिग्रह अर्थात साठा करणे. परदेशात साठा करणे गरजेचे होते त्यासाठी फ्रिजचा शोध लागला. परंतु संपन्न भारतात तर संपूर्ण वर्षभर दररोज भाज्या, फळे ,दूध,पाणी इ. सर्वच अन्नपदार्थ सहज प्राप्त होतात. फ्रिज घरात आल्याने आपणही साठा करू लागलो. अगदी पाणी सुद्धा साठवू लागलो. भाजी आधीच चिरून ठेवू लागलो. मळलेली कणिकही ठेवू लागलो. त्यामुळे सर्वच अन्नावर विषारी वायुंचा दुष्परिणाम होऊ लागला.
वातावरणातही CFC चे प्रमाण वाढले. ओझोन कमी झाला. उष्णता वाढली. फ्रिजमधील अन्नघटक आपल्याला टवटवीत जिवंत वाटतात. परंतु गारव्यामुळे पदार्थातील निसर्गतः असलेली ऊर्जा कमी होते.
पदार्थातील अग्नितत्व कमी झालेले असते. पदार्थातील प्राणशक्ती कमी होते. अनेकदा निघूनही जाते. आपल्याला बाहेरून पाहता पदार्थ जिवंत असल्याचा भास होतो. असे अन्नपदार्थातील पोषकतत्व कमी झालेले असतात.
तसेच असे पदार्थ पचायलाही जड असतात. त्यामुळे त्यांचे पचनही शरीरात सुयोग्य होत नाही. परिणामी शरीरात दोष वाढतात आणि वारंवार आजारी पडतो. CFC विषारी वायुंचा अन्नपदार्थावर झालेला दुष्परिणाम हेही आजाराच्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण आहे. त्याचा प्रत्येकाने विचार करणे अतिशय गरजेचे आहे.
अपरिग्रह ही अष्टांगयोगाची एक पायरी आहे. फ्रिजमुळे आपण गरज नसताना अन्नपदार्थांचा साठा करू लागलो. त्यामुळे नकळत दोषांचा साठा शरीरात होऊ लागला व आजार वाढले. थोडेसे अंतर्मुख होऊयात, की खरंच फ्रिजची वास्तविक गरज आपल्याला आहे का? आपण अतिरेकी वापर करतोय का हे आपण तपासूयात.
त्यानुसार आपल्या आरोग्यासाठी योग्य पावले उचलूयात.