
खोबरेल तेल –
समुद्रकिनारा आहे तिथे नारळाची झाडे सहज उपलब्ध आहेत. मुंबई ही समुद्रकिनारा संपन्न आहे. ह्याचाच अर्थ मुंबईकरांनी जेवणात खोबरेल तेल वापरणे अतिशय आरोग्यदायी आहे.
वैद्यकीय अनुभवाने जेष्ठ प्रोफेसर डॉ. बी एम् हेगडे ह्यांनी १९६४ साली केलेले खोबरेल तेलाविषयीचे संशोधन आपण समजून घेऊया.
खोबरेल तेल आईच्या दूधासमान सर्वश्रेष्ठ आहे.
आईचे दूध व खोबरेल तेल ह्यात उच्च प्रतिचे मेद आहे.
आईचे दूध व खोबरेल तेल हे दोनच पदार्थ असे आहेत ज्यात सोडियम मोनोलॉरीक अँसिड आहे. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
खोबरेल तेल व आईचे दूध हे दोनच पदार्थ असे आहेत जे तोंडातील लाळेत सहजपणे पूर्ण पचतात. ह्यासाठी नवजात बालकांचा आहार खोबरेल तेलात बनवावा. कारण नवजात बालकांच्या स्वादुपिंडातून पाचक स्त्राव स्त्रवणे सुरु झालेले नसते. नवजात बालकांमध्ये मेदाचे पचन तोंडातील लाळेत असलेल्या लायपेझ स्त्रावाने केले जाते. म्हणून आईच्या दूधाप्रमाणे खोबरेल तेलही शिशुंसाठी आरोग्यदायी आहे.
हे जाणता गर्भिणी अवस्थेत, प्रसुतीनंतर स्तनपान चालू असताना मातेनेही खोबरेल तेलाचे सेवन जरूर करावे.तसेच ज्यावेळी बाळाला वरचा आहार सुरू करतो तोही खोबरेल तेलात बनवणे गरजेचं आहे. त्यामुळे बाळाला सहज पचेल व त्याची योग्य वाढ होईल.
त्याची रोगप्रतिकारशक्तीही विकसित होईल. ज्या भागात नारळ भरपूर आहे त्या भागातील गरोदर महिला , लहान मुले तसेच घरातील सर्वांच्याच स्वास्थ्यासाठी खोबरेल तेल वापरणे किती आवश्यक आहे ह्यासाठी हा स्वतंत्र भाग लिहिला आहे. सर्वश्रेष्ठ नारळ पिकत असून आपण इतर तेलबियांचे तेल वापरत असतो. तसेच इतर भागातील लोकांनीही काही प्रमाणात खोबरेल तेल वापरायला हरकत नाही.
खोल आकाशाच्या पोटात
बसले जाऊन दैवी फल
रेलचेल ज्यात पोषकांशाची
लहानांस सर आईच्या दुधाची!
नारळा बद्दल अजून सखोल जाणून घेऊयात पुढील लेखात!