
भारतात चहाची लागवड कशी झाली ते पाहू.
चहा ही भारतातील वनस्पती नाही. ई.स. १७५० पर्यंत आपल्या देशात चहाचे उत्पन्न होत नव्हते. ब्रिटिश लोकांनी भारतात चहाची रोपे आणली. त्यांनी थंड हवेच्या ठिकाणी वास्तव्य केले व तिथे स्वतःसाठी चहाची लागवड केली.
चहाचे औषधी स्वरूप जाणून घेऊ.
चहा ही आहारीय वनस्पती नाही. थंड प्रदेशात रहाणाऱ्या लोकांचा रक्तदाब थंडी मुळे कमी असतो. रक्तदाब वाढविण्यासाठी उत्तेजकाची आवश्यकता असते. चहा-कॉफी हे उत्तेजक पदार्थ आहेत. थंड प्रदेशातील उदा. युरोप, अमेरिका, कँनडा, जम्मू-कश्मीर मधील लोकांना चहा कॉफी हे औषध आहे. आपल्या भारतात इतर राज्यांमध्ये मात्र अतिथंडी असताना चहा-कॉफी घेणे ठीक आहे. परंतु पूर्ण वर्षभर पिणे अयोग्य आहे.

चहा उष्ण असून त्यामध्ये कॅफीन, टॅनीन, टॅनीक अॅसिड इ. १८ ते २० प्रकारची रसायने असतात जे रक्तातील आम्लता वाढतात. कॉफी चहापेक्षाही उष्णगुणाची आहे. चहा-कॉफी कडू चवीचे असून ते पेशींचा संकोच करतात. पेशींमध्ये शोष होतो, कठीणता आणतात. रक्तवाहिन्याही कठीण बनतात.
चहा कॉफी व रक्तदाब
हे उत्तेजक पदार्थ असल्याने रक्तदाब वाढवितात. संतुलित रक्तदाब असताना आपण चहा – कॉफी पिणे चालूच ठेवले तर हळूहळू रक्तदाब वाढत जातो व नंतर आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. यासाठी रक्तदाब संतुलित असतानाच चहा – कॉफी पिणे टाळावे. तसेच ज्यांना रक्तदाब आहे त्यांनी चहा-कॉफी बंद करणे गरजेचे आहे म्हणजे औषधांची मात्रा जास्त घ्यावी लागणार नाही.
चहा कॉफी व रक्त आम्लता
आपल्या जठरात आम्लता तयार होत असते. उष्णकटिबंधातील लोकांच्या जठरामध्ये प्रमाणापेक्षा थोडे जास्त आम्ल तयार होते. परिणामी रक्त तुलनेने acidic असते. रक्ताचा pH 7.4 असणे हे आरोग्य आहे. शीतकटीबंधातील लोकांचे रक्त क्षारीय अर्थात pH 8 पेक्षा जास्त असतो. त्यांनी आम्लगुणाची चहा-कॉफी घेतली तर त्यांचा रक्ताचा pH संतुलित होतो. या उलट उष्णकटिबंधातील लोकांनी चहा काँफी घेतली तर अनेक आजार निर्माण होतात. प्रौढ व्यक्तीला चहा काँफीची सवय लागलेली आहे. ती आपण बदलू शकतो. प्रमाण कमी करु शकतो. पण आपल्या लहान मुलांना चहा काँफीची सवय न लावणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.
जशी मनाला प्रेरणेची गरज असते तसेच शरीरालाही उत्तेजना मिळावी म्हणून चहा-कॉफी ही उष्णपेये आपण घेत असतो.
आपल्याला व्यसन तर जडलेय उष्णपेयाचे,
त्यावरही मात करूयात पर्यायी उष्णपेयाने!
उष्णकषायाने !