बुद्धीवर्धक:-

लहान मूल म्हणजे मातीचा गोळा! आकार द्यावा तशी मूर्ती घडते. म्हणूनच बाल्यावस्था हा जीवनाचा निर्माण काळ आहे. याकाळात बालकाच्या शारीरिक बौद्धिक व मनोवैज्ञानिक विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर बालकांमध्ये काही विशिष्ट व्याधींची उत्पत्ती होत असते, म्हणून या काळात या व्याधींपासून रक्षण करण्यासाठी तसेच बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी बालकांची रोगप्रतिकारक्षमता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.

ज्याप्रमाणे आजच्या काळात बालकांचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे विटॅमिन ड्रॉप, ग्राईप वॉटर, जन्म गुटी वगैरे दिले जातात अगदी त्याचप्रमाणे बालकाचे आरोग्य, बल, बुद्धी यांच्या विकासासाठी प्राचीन काळात अनेक योग, लेहन म्हणजेच अवलेहाच्या स्वरूपात बालकाला चाटवले जात होते.

आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या लेहन योगात सुवर्णाला विशेष महत्त्व आहे, कारण सुवर्ण हे विशेष रूपाने बुद्धीवर्धक आहे म्हणून नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सुवर्ण मधासोबत चाटवले जाते. त्यामुळे आयुर्वेदातील सुवर्णप्राशन विधी सर्व जनमाणसात लोकप्रियप्रचलित आहे. परंतु सुवर्णप्राशन व्यतिरिक्त इतरही औषधांनी युक्त अवलेह चाटण म्हणून देण्याचा प्रघात आयुर्वेदामध्ये बालकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी वर्णन केला आहे.लेहन योग्य बालक कोणते?

लेहन कोणाला द्यावे ते पुढील प्रमाणे – :

१) ज्या बालकांच्या मातेच्या अंगावर दूध कमी प्रमाणात येते किंवा येत नाही

२) ज्या मातेच्या बाळाची डिलिव्हरी म्हणजेच प्रसूती नॉर्मल न होता सिजर झाली असेल असे बाळ

३) ज्या बालकांमध्ये कफदोष कमी तसेच वात व पित्त यांच्या रोगाने ते पीडित असल्यास

४) ज्या बाळाचे पोट स्तनपान करून ही भरत नाही.

५) जे बाळ स्तनपान करताना वारंवार रडते, ज्या बालकास रात्री गाढ झोप लागत नाही

६) जे बालक जास्त प्रमाणात जेवण करते.

७) ज्या बालकास मलमूत्र कमी प्रमाणात होतात.

८) ज्या बालकाचा अग्नी म्हणजेच जाठराग्नी तीव्र असतो.

९) जे बालक रोग रहित असून कमजोर वाटते.

१०) जे बालक दोन ते तीन दिवस मल त्याग करत नाही.

पुढील लेखात –

लेहन कोणत्या बालकाला करु नये?