बालकाचे करावे ऐसे अभ्यंग,
होईल पुष्ट बालकाचे सर्वांग |
कष्ट बाल शरीराचे सारे हरती,
ऐशी अभ्यंगस्नानाची महती ||

मसाज महत्व – :
- मसाजमुळे बालकांच्या स्नायुंना ताकद मिळून थकवा दूर होतो.
- मुलांचे डोळे व दृष्टी चांगली होते.
- सप्तधातूंची वाढ होवून शरीर पुष्ट होते व आयुष्य वाढते.
- झोप चांगली लागते.
- बालकांची त्वचा मऊ, शुद्ध होऊन स्किन टोन व कॉम्प्लेकॅशन सुधारते.
- लहान मुले चालताना रांगताना पालथी पडत असताना त्यांना वारंवार आघात होत असतात मसाजामुळे हे आघात व त्यामुळे होणारे कष्ट व पिडा त्यांना सहन होतात.
- शरीरातील कफ व वात कमी होतात
मसाज करताना घ्यायची काळजी –
आपली नखे कापलेली असावीत जेणेकरून बालकांना इजा होणार नाही.बालकांना मसाज करताना हाताळत असताना तेलकटपणामुळे बाळ हातातून घसरून इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे हाताळताना त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.बालकांना मसाज हलक्या हाताने व हळूवारपणे करणे अपेक्षित आहे फार दाबून किंवा जोरात मसाज करू नये.
तेल:-
मसाजसाठी लागणारे तेल अगदी सुख उष्ण करून घ्यावे जेणेकरून बालकांना ते सहन होईल. (तेल direct गरम न करता तेलाची वाटी गरम पाण्यात धरून गरम करावी)काही बालकांची त्वचा नाजूक असते त्यांना तेल सहन झाले नाही तर पुरळ येतात अशावेळी तेल बदलून त्यांना मसाज करावा किंवा योग्य त्या वैद्यांचा सल्ला घ्यावा.अशाप्रकारे तेल अभ्यंग बालकांसाठी अत्यंत हितावह असल्यामुळे त्यांचा नित्यनियमाने बालकांसाठी वापर करावा.