अन्नाद अवस्थेतील आहार
साधारणतः 2 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंतची ही अवस्था असून मुलांच्या अन्न खाण्याच्या सवयी व चवीनुसार आहारात बदल झालेले असतात. या मुलांचे वय हे वजन, उंची या शारीरिक वाढीचे असल्याने त्याचा शारीरिक विकास तसेच बौद्धिक विकास चांगला व्हावा या दृष्टिकोनातून आहाराची योजना करणे अपेक्षित असते. त्याचप्रमाणे बालकांमध्ये कॅल्शियम, लोह, सर्व प्रकारची जीवनसत्व, प्रथिने, कर्बोदके व पिष्टमय पदार्थ यांची कमतरता भासू नये यासाठी संतुलित प्रमाणात ते आहारात समाविष्ट करणे गरजेचे आहे. याच काळात मुले विद्याभ्यासासाठी शाळेत जात असल्यामुळे त्यांचा “टीफीन” सकस पौष्टिक असणे अपेक्षित आहे.

आहारातील पदार्थ
अन्नाद अवस्थेतील बालकांच्या आहारातील पदार्थ मुख्यता सर्व प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, डाळी, कडधान्य, दूध व दुधाचे पदार्थ, फळे, अंडी, मांसाहार, चपाती, भाकरी, थालीपीठ, भात यांनी संतुलित आहार मुलांच्या नाष्टा व जेवणामध्ये देणे अपेक्षित आहे.
रोज सकाळी साधारणतः सहा ते सातच्या दरम्यान मुलांना उठण्याची सवय लावून उठल्यानंतर दात घासून दूध पिण्याची सवय लावावी.शक्यतो एक-एक कप दूध सकाळी व रात्री दिले असता मुलांना पूरक आहे; त्याचा अतिरेक नको. दुधामध्ये जाहिराती पाहून हेल्थ ड्रिंक्स म्हणून बोर्नविटा, कॉम्प्लॅन, कॅलॉक्स सारखे घटक न वापरता शतावरी कल्प वापरणे आरोग्याच्या व पोषणाच्या दृष्टिकोनातून हितावह आहे.
सकाळच्या दुधासोबत सुकामेवा व सुका मेव्याचे लाडू , गुळ शेंगदाण्याचे लाडू दिला असता मुलांचे पोषण व लोह आणि रक्त वाढीचे उपयुक्त ठरते. त्यानंतर सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान नाष्ट्यासाठी किंवा टिफिन मध्ये शिरा, उपीट, छोटेसे डोसे, छोटेसे थालीपीठ, वेगवेगळ्या भाज्यांपासून केलेले पराठे द्यावेत; जेणेकरून बालकांना सर्व प्रकारच्या भाज्या, धान्य, डाळी यांचा आहारामध्ये समावेश होईल.
बरेच ठिकाणी दूध किंवा चहासोबत बिस्किट देण्याची अत्यंत चुकीची आहार शैली असते. त्यामुळे मुलांना अपचन, मलावष्टंभ, स्थूलता किंवा कृशता, कृमी, दात किडणे यासारख्या व्याधी उत्पन्न होतात म्हणून शक्यतो या गोष्टी मुलांना देऊच नयेत. किंबहुना घरातल्या मोठ्यांनी त्या घरात आणू नयेत आणि खाऊ नयेत त्यामुळे मुलेही ते खाणार नाहीत.
त्यानंतर साधारणता अकरा ते एक या वेळात मुलांना त्यांचे जेवण किंवा टिफिन मध्ये पचनशक्ती नुसार एक ते दोन चपाती, पालेभाजी, फळभाजी व काकडी, गाजर, डाळिंब, बीट यापासून बनवलेली कोशिंबीर द्यावी. काही मुलांना गोड पदार्थांची आवड असते त्यांना या सर्व आहारासोबत सेंद्रिय गूळ व देशी गायीचे तूप तोंडी लावायला मधून मधून द्यावेत व त्याचबरोबर आहारात तीळ, जवस, शेंगदाणे खोबरे यांच्यापासून तिखट नसणाऱ्या अशा चटण्या तयार करून द्याव्यात जेणेकरून सर्व सूक्ष्म पोषक तत्वे त्यांना मिळतील.
मुलांच्या आहारामध्ये तेलकट, तिखट त्याचबरोबर शिळे अन्न, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न पदार्थ नसावेत. मुलांना टिफिन किंवा डब्बा देत असताना तो प्लास्टिक डब्यात देऊ नये. त्यासाठी स्टीलचा डबा वापरणे जास्त हितावह ठरते. तसेच पाण्यासाठी दिली जाणारी वॉटर बॅग तांब्याची किंवा मेटलची बाजारात आलेली आहे ती वापरणे आरोग्यदायी आहे.