धूपन –
आज आपण धूपनातील घटकांचे महत्व जाणून घेऊयात. प्रथम देशी गाईंच्या शेण/गोबर विषयी पाहुयात. देशी गाईच्या शेणामध्ये 23% ऑक्सिजन असतो. आपल्याला जगण्यासाठी 21% ऑक्सिजन असलेल्या . वातावरणाची गरज असते. आज पृथ्वीवर थंड हवेच्या ठिकाणीही 19 ते 20% ऑक्सीजन आहे. गावामध्ये साधारणतः 16-17 % शहरात 13 ते 14 % ऑक्सिजन आहे. हवेत योग्य प्रमाणात ऑक्सीजन असेल तर हवा शुद्ध राहते आणि श्वसनास योग्य प्रमाणात आँक्सिजन मिळतो.
ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असता हवेमध्ये रोगजंतू वाढू लागतात व हवा दूषित होते. आपल्या शरीरातही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असता रक्त शुद्धीमध्ये बाधा येते. रक्ताची ताकद कमी होते. परिणाम स्वरूप रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशा रीतीने ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाले तर एकिकडे शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी होते तर दुसरीकडे वातावरणातील रोगजंतूची वाढ होते. आज अशा बिकट परिस्थितीत आपण सर्वजण आहोत. आपली बालके ही याच परिस्थितीत अडकली आहेत.

अनेकदा आपल्या मुलांना वारंवार इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण सतत काळजी घेत असतो. आपण अन्नपाणी शुद्ध राहावे यासाठी अतोनात प्रयत्न करतो. पण जो श्वास ज्याशिवाय आपण क्षणभरही जिवंत राहू शकत नाही अशा श्वासाकडे आपले लक्ष जात नाही. तसेच कोणत्या वातावरणात आपण श्वास घेतो इथेही आपले लक्ष जात नाही. आज हवेमध्ये प्रदूषण का झाले आहे ह्याची अनेक कारणे माहीतच आहेत. झाडे लावणे हा हवेतील ऑक्सिजन वाढवण्याचा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे तर दुसरा उपाय तितकाच महत्त्वाचा आहे तो म्हणजे धुपन घरोघरी होणे आवश्यक आहे.
• देशी गाय कितीही दूषित वातावरणात असेल तरी सुद्धा तिच्या शेणामध्ये 23% ऑक्सिजन असतो.
• शेण सुकून शेण्या / गोवरी तयार होतात त्यामध्ये 27% ऑक्सीजन असतो.
• शेण्या जाळल्या असता राखेमध्ये 30% ऑक्सिजन असतो.
• भस्म झाले असता 46.6% ऑक्सिजन असतो.
हे वाचून नक्कीच आश्चर्य झाले असेल !
गायीच्या शेणीचे गुणधर्म –
शेणी जाळतो तेव्हा वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते त्यामुळे वातावरण शुद्ध होते.अशा हवेत रोगजंतू वाढू शकत नाही. असे हे देशी गायीच्या शेणीचे धूपनासाठी महत्त्व आहे. देशी गायींचे पालन करणारे काही लोक गावाकडे असतात किंवा काही गोशाळासुद्धा ह्या कामात आपला हातभार लावत आहेत. अशा लोकांना विनंती करुन गाईचे शेण हे जमीनीवर न पडता वरच्यावर मिळवता आले तर आणखीनच छान! ऐकताना थोडे विचित्र वाटेल पण वरच्यावर शेण मिळवण्याचा विचार हा की जमीनीवर पडलेल्या शेणाचे गुणधर्म काही प्रमाणात जमीनीमध्ये जातात.
ह्यासाठी पूर्ण गुणांचा उपयोग व्हावा म्हणून असे शेण मिळवण्याचा प्रयत्न करावा. प्लास्टिकच्या कागदावर जाडीला पातळ अशा शेणी व्यवस्थित वाळवून जास्त दिवस वापरता येतात. तसेच धूपनासाठी सांगितलेल्या घटकातील कडुनिंबाची पाने सुध्दा आपण साठवून वाळवू शकतो व हवे तेव्हा वापरु शकतो. नैसर्गिकरीत्या गोळा केलेल्या वेखंड, कडूनिंब, जटामांसी, यांच्या जंतुनाशक गुणधर्माचा उपयोग हवेतील जंतुनाशन करण्यासाठी चांगला होतो. ह्या शेण्यासोबत औषधी भरड, कापूर तूप वापरले असता सर्वाधिक फायदा होऊ शकतो. औषधी भरड शक्य झाली नाही तरी शेणी, कापूर,तूप तरी धूपनासाठी वापरावे.
झोपण्यापूर्वी धुपण केल्याने रात्रभर भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. तसेच धूपन करताना दुसऱ्या दिवशी घालावयाचे कपडे कपाटात न ठेवता वरच ठेवले असता कपड्यांचेही आपोआप धूपन होते. तुम्ही अनुभवाल कपड्यांना धूपनाचा वास येतो. असे कपडे घातले असता दिवसा रोगजंतू पासून सुरक्षित राहू शकतो.
तसेच सकाळ-संध्याकाळ देवपूजा करताना उदबत्ती ऐवजी देशी गायीच्या शेणापासून बनवलेल्या धूपकांडीचा वापर करावा. अशा रीतीने एक- दोन वेळा धूपकांडी आणि एकदा धूपन केले असता घरातील वातावरण शुद्ध व भरपूर ऑक्सिजन युक्त होते. आजची परिस्थिती पाहता धूपन करणे किती गरजेचे आहे हे आपण सर्वजण समजू शकतो.
घरोघरी असे धूपन झाले तर आपल्या मुलांसाठी श्वास घेणे नक्कीच सुखकर होईल. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास नक्कीच अनमोल मदत होईल.
शेण्याबाबत संदर्भ: स्व.अमरबलिदानी डॉ. राजीवभाई दीक्षित ह्यांच्या प्रेरणेने स्थापित महर्षि वाग्भट गौशाला आणि संशोधन केंद्र
इथे शेणाचे रासायनिक विश्लेषण झाले आहे.