Benefits of Eating shudh tup in Marathi | उपाशी पोटी तूप खाण्याचे फायदे

उपाशीपोटी तूप खाण्याचे फायदे
उपाशीपोटी तूप खाण्याचे फायदे

उपाशी पोटी तूप खाण्याचे फायदे :

जो खाईल तूप त्याला येईल रूप, अशी एक म्हण पूर्वी प्रचलित होती. त्याचे कारणही तसेच आहे. पूर्वीचे लोकं रोजच्या जेवणात तुपाचा भरपूर वापर करायचे.

 त्याचमुळे त्याचे आरोग्यसुद्धा अतिशय चांगले राहायचे. ते धष्टपुष्ट दिसायचे. रोजच्या  जेवणात  तूप वापरण्याचे अनेक फायदे आहेत (उपाशी पोटी तूप खाण्याचे फायदे). 

पूर्वीच्या काळी खेडोपाडीच नव्हे तर शहरांमधून सुद्धा लोणी विकायला येत होते. याचे कारण खेड्यांमध्ये बहुतेक जणांकडे शेती असल्याने त्यांच्याकडे गायी-म्हशी हमखास पाळल्या जात होत्या.त्यामुळे घरोघरी दूधदुभत्यांची रेलचेल रहायची. आवश्यक तेवढे दूध घरी ठेवून इतर दुधाचे दही लावले जात होते. त्या दह्यापासून लोणी तयार केले जात होते.

 तूप खाण्याचे फायदे :

 नंतर घरातील बाया-बापडे हेच लोणी बाजारात विकायला आणायचे. त्या काळी दुधाचे उत्पादन भरपूर होत असल्याने तुपाला भावसुद्धा कमी होता. त्यामुळे पूर्वीचे लोक आपल्या जेवणात हमखास तुपाचा वापर करायचे. त्याचमुळे पूर्वीच्या लोकांची शरीर प्रकृती आताच्या लोकांच्या तुलनेत दांडगी होती. 

उपाशीपोटी तूप खाण्याचे फायदे
उपाशीपोटी तूप खाण्याचे फायदे

पूर्वीच्या तुलनेत आताच्या माणसांचे जीवन ऐशोआरामाचे झाले आहे. परिणामी लठ्ठपणासारखे इतर आजार त्याला जडले. त्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यासाठी आज अनेकजण तुप खाणे टाळतात. परंतु हा एकप्रकारेचा गैरसमज आहे. 

शुद्ध तुप खाण्याचे अनेक फायदे आहेत (Benefits of Eating shudh tup in Marathi). तूप खाल्ल्याने शरीरातील उष्मांक वाढतो. त्यामुळे डॉक्टर आजारी व्यक्तींना जेवणात तू:प खायला सांगतात. बाळंतपणात महिलांना शुद्ध तुपाचा शिरा करून खायला देतात. त्याचे कारण हेच की, तुपामुळे शरीरात ताकद निर्माण होते. 

शुद्ध तुप :

शुद्ध तुप खाण्याचे अनेक फायदे आहेत. तूप खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. म्हणूनच पूर्वीचे लोक आताच्या लोकांच्या तुलनेत अधिक अंगमेहनतीची कामे करायचे. तसेच दररोज जेवणात तुपाचा वापर केल्यास वात आणि पित्ताचा त्रास होत नाही. जेवणात तूप खाल्ल्याने पचनक्रियासुद्धा चांगली राहते. 

तूप खाल्ल्याने गॅसेस तसेच पित्ताचे प्रमाण कमी होते. शुद्ध तुपामुळे त्वचा मऊ राहते. त्यामुळे तुपाची चेहऱ्यावर मसाज करणे फायदेशीर ठरते.

 तुपामध्ये तेलापेक्षा पोषक तत्त्वे अधिक असतात. लोण्यापेक्षा तुपाचे सेवन करणे अधिक चांगले असते. आजकाल बाजारात मिळणाऱ्या तुपामध्ये भेसळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घरीच दूधापासून तूप तयार करणे अधिक चांगले आहे.

Here we Conclude topic : Benefits of Eating shudh tup in Marathi

Must Read :

गूळ आणि तूप खाण्याचे फायदे