उन्हाळा आणि वर्तमान महामारी [Part 4]

steam inhalation at home
steam inhalation at home

आज  “आपण वाफ कशी घ्यायची” (steam inhalation at home) याविषयी पाहणार आहोत. महामारीचा परजीवी गरम पाण्याच्या ५० ते ६० डिग्री तापमानाच्या वाफेला मात्र जिवंत राहू शकत नाही हे आपले खूप मोठे सुदैव आहे.

वाफेचे महत्त्व  सांगणारे अनेक व्हिडिओ आणि मेसेजेस सोशल मीडियावर  सर्वत्र पाठवले जात आहेत.

परंतु एक लक्षात आले की त्यामध्ये वाफ नेमकी कशी घ्यावी याचा उल्लेख नाहीये. तसेच अनेकांनी स्टीमरने वाफ घेतो असे सांगितले आहे. स्टीमर मुळे त्यांना फायदा झाला ही गोष्ट चांगलीच आहे. परंतु जर फुफ्फुसांपर्यंत वाफ पोहोचवायची असेल तर “स्टीमर” हा काही अचूक पर्याय नाही.

पारंपारिक पद्धतीने घेतलेली वाफ हा सर्वोत्तम मार्ग आहे. आता ही वाफ कशी घ्यावी ते आपण पाहूया.

         अनेकांना वाटेल की आता वाफ घ्यायला पण शिकवणार का? परंतु आधुनिक जीवनपद्धतीमुळे आपण “वाफ म्हटले की स्टीमर” हेच आपल्या डोळ्यासमोर येते. त्यामुळे हा मुद्दा येथे विशेष सांगावासा वाटला.

जेणेकरून आपल्या भावी पिढीलाही नेमकी वाफ (steam inhalation at home) कशी घ्यायची हे समजू शकते.

         स्टीमर मधूनही वाफ नक्कीच निर्माण होते. परंतु ती वाफ मांसपेशीवेदना, त्वचारोग, सांधेदुखी यासाठी उपयोगी आहे. कारण स्टीमरची वाफ तोंडाने किंवा नाकाने नीट ओढू शकत नाही. त्यामुळे ती फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकत नाही.

        मध्यम आकाराच्या भांड्यात ( पातेले ) अर्धे पाणी घ्यावे. पाणी उकळू लागले की वाफ निर्माण होते. ही वाफ बाहेर जाऊ नये यासाठी झाकण ठेवावे. पाणी उकळू लागले वाफ निर्माण झाले की गॅस बंद करून ते भांडे खाली उतरावे .

पाण्यामध्ये थोडेसे झेंडू बाम अथवा अमृतधारा किंवा ओवा असे  थोड्या प्रमाणात टाकावे ( हे काहीही न टाकता फक्त पाण्याची वाफसुद्धा चालेल.) हे टाकताना सुद्धा लांब चमच्याच्या टोकावर या वस्तू घेऊन ते टोक अलगद पाण्यामध्ये  सोडावे.

अलगद झाकण बाजूला करून वस्तू पाण्यामध्ये सोडाव्यात. नंतर जमिनीवर मांडी घालून बसावे. डोक्यावरती टॉवेल ओढावा आणि भांड्याचे झाकण अलगद थोडेसे उघडावे. वाफ एकदम तोंडावर येणार नाही ह्याची पूर्णतः काळजी घ्यावी.

नंतर घशाने अथवा नाकाने वाफ ओढवी. परंतु सोडताना मात्र तोंडानेच वाफ सोडावी. घसा दुखत असेल तर घशाने वाफ घ्यावी आणि तोंडाने सोडावी. नाकात अडथळा असेल तर नाकाने घेऊन तोंडाने सोडावी.

आपल्या त्रासानुसार नाकाने अथवा घशाने वाफ जरी घेतली तरी सोडताना मात्र तोंडानेच सोडावी. वाफ  नाकावाटे सोडली तर डोळ्यांना वाफेच्या उष्णतेचा दुष्परिणाम होऊ  शकतो. डोळ्यांना इजा होऊ शकते.

डोळे सुरक्षित रहावे यासाठी वाफ नेहमी तोंडावाटेच सोडावी.  अशा रीतीने वाफ घेतली असता ही वाफ नाक, घसा आणि फुफ्फुसापर्यंत पोहोचते. नाक, घसा या भागात कोणताही परजीवी असेल तर तो जिवंत राहू शकत नाही. त्याचप्रमाणे वाफ फुप्फुसात पोहोचल्यामुळे फुप्फुसाचेही निर्जंतुकीकरण होते.

अशी वाफच रोगमुक्त होण्यास आणि संसर्ग होवू न देण्यास मदत करते.

              ज्या व्यक्ती दररोज कामानिमित्त बाहेर जात आहेत त्यांनी घरी आल्यानंतर अशी वाफ घ्यावी. तसेच गर्डीच्या ठीकानी अथवा बाजारातून जाऊन आल्यानंतर सुद्धा वाफ घ्यावी. म्हणजे परजीवी हा नाकाच्या  नाकाच्या भागातच नष्ट होईल.

तसेच ज्या घरात पॉझिटिव्ह केसेस आहेत त्या घरातील सर्वच सदस्यांनी दिवसातून कमीत कमी एक-दोन वेळा अशी वाफ घ्यावी.