
“श्वास” याविषयी आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु वर्तमान वाढलेली महामारी पाहता काही मुद्दे शेअर करावेसे वाटले.
भारतामध्ये वर्षभरात उन्हाळा (उन्हाळा आणि वर्तमान महामारी), पावसाळा आणि हिवाळा हे तीन बदल (सीझन) निसर्गात होत असतात. प्रत्येक सीझनमध्ये दोन- दोन ऋतू येतात. संपूर्ण वर्षाभरात असे सहा ऋतू पहायला मिळतात. उन्हाळ्यामध्ये वसंत आणि ग्रीष्म हे दोन ऋतू येतात.

पावसाळा व थंडी मध्ये साठलेला कफ वसंतऋतू मध्ये उष्णता वाढू लागते, तसे उष्णतेमुळे पातळ होऊ लागतो आणि कफ वाढतो. त्यामुळे वसंतऋतूत कफाचे आजार होतात. तर ग्रीष्म ऋतूमध्ये पूर्णतः उष्णता वाढलेली असते. त्यामुळे थंड पदार्थ सेवन केले जातात, थंड पाण्याने वारंवार अंघोळ केली जाते. त्यामुळेही ग्रीष्म ऋतूत कफ होतो.
“वसंतऋतू” हा साधारणतः फेब्रुवारी मध्यापासून मार्च ते एप्रिलमध्यपर्यंत असतो. तर “ग्रीष्म ऋतू” एप्रिलमध्य ते जूनमध्यपर्यंत असतो. थंडीचा सीझन संपून उन्हाळ्याला सुरुवात होते तसे पहिला वसंत ऋतू सुरू होतो आणि कफ वाढू लागतो आणि नंतर कडक उन्हाळा वाढू लागतो त्याला “ग्रीष्मऋतू” म्हणतात.
वर्तमान महामारी नुसार आपण रोजच्या जीवनात काय केले पाहिजे याविषयी थोडक्यात पाहू.
उन्हाळा आणि वर्तमान महामारी :
वरील मुद्दे लक्षात घेता “वसंत आणि ग्रीष्म” ऋतूमध्ये सर्दी होणे, कफाचा त्रास होणे, खोकला होणे, ताप येणे, डोके जड होणे, घसा दुखणे, तसेच ताप येतो त्यावेळी सर्व अंग दुखणे ही लक्षणे दरवर्षीच पहायला मिळतात. परंतु सध्या महामारी चालू आहे त्यामुळे संपूर्ण मानवजात ही भीतीने ग्रासलेली आहे. प्रत्येक गोष्टीकडे ” महामारीच्या दृष्टीनेच” (उन्हाळा आणि वर्तमान महामारी) पाहिले जाते.
यासाठी कोणते उपाय करावेत :
साधी शिंक आली नाकातून थोडेसे पाणी आले, ताप आला तरी सुद्धा मनामध्ये महामारीचाच पहिला विचार येतो. यासाठी आपण काही गोष्टी केल्या तर आपल्याला कफाचा त्रास होणार नाही. झालेला त्रास कमी होईल. मनात भीतीही निर्माण होणार नाही.
• डोकं उबदार राहील ही काळजी घेणे गरजेचे आहे. गरम होतं त्यामुळे आपण फॅनखाली डायरेक्ट झोपतो. अंगावरही पांघरुन घेत नाही. गार पाण्याने अंघोळ करतो.
डोकं गार होतं परिणामी ज्यांना मुळातच सायनस, कफाचा त्रास आहे त्या लोकांना कफाचे त्रास होतात – जसे डोकं जड होते, घसा दुखणे, सर्दी होणे , शिंका येणे, खोकला होणे, ताप येणे ही लक्षणे पाहायला मिळतात.
यासाठी रात्री झोपताना आपलं डोकं उबदार राहील याकडे लक्ष द्यावे. असं कोणतेही लक्षण दिसलं तर लगेच गरम पाण्याची वाफ घ्यावी , गरम पाणी मध्ये मध्ये प्यावे.
कपभर गरम पाण्यामध्ये चिमुटभर चमचा मीठ व पाव चमचा हळद घालून गुळण्या कराव्यात .
सरळ साधे आयुर्वेदिक उपचार खालीलप्रमाणे :
• सर्दी झाली, खोकल्यातून कफ पडत असेल तर आलं / सुंठ, लवंग, मिरी, तुळस, दालचिनी,गवतीचहा हे सर्व एकत्र करून त्याचा काढा करू शकतो.
• कोरडा खोकला असेल तर ज्येष्ठमध व हळद अर्धा अर्धा चमचा एकत्र घेऊन गुळासोबत चाटण करू शकतो.
• वारंवार कफ पडत असेल तर सुंठ, मिरी मधासोबत चाटण करू शकतो. तसेच लवंग आणि मिरी हे जर मधेमधे तोंडात ठेवलं तर वारंवार येणारी खोकल्याची उबळ (ढास) कमी होते.
• खोकल्याची ढास खूपच असेल तर छातीला तीलतेलात चिमुटभर सैंधव घालून लावावे. आणि छाती गरम पाण्याच्या पिशवीने अथवा तवा गरम करून त्यावर कापड गरम करून शेकवी.
• ” अमृतधारा “ हे औषधही अत्यंत उपयोगी आहे. रुमालावर १- २ थेंब टाकून वास घेतला तर लगेच नाक मोकळं होतं. कफ कमी होण्यास मदत होते. विशेषतः बाहेर जात असताना जर आपण मास्कला अमृतधारा चे एक-दोन थेंब लावले तर एक तासभर मास्कला औषधाचा वास राहतो आणि श्वास घ्यायला सुद्धा मदत होते.
अमृतधारा उष्ण असल्यामुळे रोगजंतू शिरू शकणार नाही. रुमालाला सुद्धा आपण अमृतधारा चे एक-दोन थेंब लावू शकतो. अमृतधारा हे बाजारात विकत मिळते.
घरीही बनवू शकतो. त्यासाठी भीमसेनी कापूर, ओवासत्व(ओवफुल अर्क), पुदिनासत्व(पुदिनाफुलअर्क) हे समप्रमाणात एकत्र केले असता ते अर्ध्यातासामध्ये विरघळते आणि अमृतधारा तयार होते.
• सर्दी कफ जास्त असेल तर याचे चार थेंब एक कपभर गरम पाण्यामध्ये घालून दिवसातून तीन-चार वेळा घेऊ शकतो लहान मुलांमध्ये दोन थेंब वापरावे.
• गरम पाण्यामध्ये अमृतधारा घालून वाफही घेऊ शकतो
• भीमसेनी कापूर, ओवा आणि पुदिन्याची पानं असे एकत्र करून छोटी पुरचुंडी करून तिचा वास दिवसभर मधेमधे घेत राहिले तरीसुद्धा कफ कमी होतो. डोके, घसा हलके होते, जडपणा जातो.
• नाकाच्या आतील पातळ नाजूक त्वचेचे स्वाथ्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढावी ह्यासाठी २-२ थेंब लाकडी घाण्याचे खोबरेल तेल अथवा देशी गायीचे तूप अथवा पंचगव्य नस्या दिवसातून १ ते २ वेळा सोडू शकतो .
ह्या सर्वच उपायांचा कफ कमी होण्यास आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यात मदत होते.
Here we conclude topic उन्हाळा आणि वर्तमान महामारी.
Must Read Articles :