
साखर
साखर कशी तयार करतात ते आता समजून घेवूया.
ऊसाच्या रसावर अनेक प्रक्रिया करून साखर तयार होते. ती गोरीपान करण्यासाठी अनेक मानवनिर्मित घातक रसायने वापरली जातात. ईश्वराने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ही मानवाला उपकारकच आहे. ऊसाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फरस असते जे ऊसातील साखर पचवण्यासाठी आवश्यक आहे. ऊसाच्या रसामध्ये गोडवा असला तरी तो पचवण्यासाठी लागणारी आवश्यक तत्वे ऊसामध्येच आहेत. परंतु साखर बनविताना केलेल्या रसायनांच्या अतिवापरामुळे ऊसातील फॉस्फरस सारखी आवश्यक अनेक तत्वे नष्ट होतात. ऊसापासून साखर बनविणे हे भारतीय शास्त्र नाही.

आता साखरेचे शरीरात कसे पचन होते हे समजून घेऊयात.
१) साखर ही आम्लधर्मी (Acidic) आहे. ती शरीरात गेली कि शरीरात आम्लता वाढते.आपल्या जठरामध्ये (stomach) पचनास आवश्यक आम्ल ( अँसिड) असते. साखर पोटात गेली की जठरात अजून आम्लता वाढते. रक्तातीलही आम्लता वाढते. रक्तात आम्लता वाढली तर अनेक प्रकारचे रोगजंतूंची शरीरात वाढ होते. त्यामुळे लहान मुले वारंवार आजारी (infection) पडतात. अनेक लहान मुलांना दर महिन्याला डाँक्टरकडे घेऊन जावे लागतेच. वारंवार सर्दी, खोकला, ताप होत असतो. त्यामुळे वारंवार अँन्टिबायोटिक सारखी औषध मुलांना घ्यावी लागतात. रक्तातील आम्लता वाढली असता असा त्रास मोठ्या वयाच्या व्यक्तीलाही होतोच.
२) साखर पचायलाही जड अर्थात उशिरा पचते. तिला पचविण्यासाठी यकृतावरही ताण येतो.तसेच पचायला वेळ लागल्याने वायुची निर्मिती अधिक होते. त्यामुळे आज मुलांमध्ये वजन वाढणे, पोट साफ न होणे, भूक अति लागणे अथवा कमी लागणे, अँसिडिटी, लहान वयातच अनेक मुलांच्या रक्तातील साखरही वाढते आहे. इ. विविध तक्रारी दिसतात.
३) तसेच साखर पचण्यासाठी आवश्यक तत्वेच साखरेत नसल्याने शरिरातील आवश्यक फॉस्फरस,कँल्शियम इ.आवश्यक तत्व तिच्या पचनासाठी वापरले जातात. त्यामुळे हाडांच्या, दातांच्या वाढीसाठी लागणाऱ्या ह्या तत्वांचा साठा कमी पडतो. मुलांची हाडे आणि दातांच्या विकासावर दुष्परिणाम होतो.
४) तसेच साखरेतील रसायनांचा यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंड ह्या अवयवांवरही परिणाम होतो. ही रसायने शरीराच्या बाहेर काढण्यासाठी यकृत आणि किडनी वरही ताण येतो.
साखरेचे दुष्परिणाम लहान मुलांपासून मोठ्या वयाच्या व्यक्तींलाही भोगावे लागतात.
रक्तातील आम्लता वाढते,यकृतावर ताण येतो, fatty liver,अतिप्रमाणात कफ तयार होतो, वारंवार infections होतात, वारंवार ताप येणे,मधुमेह (Diabetes) होतो, cholesterol वाढते, लठ्ठपणा व वजन वाढते, चरबीच्या गाठी, fibroids होतात. मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये मध्ये PCOD चे प्रमाण वाढते, हाडांची झीज osteoporosis, रक्तातील विकृत अम्लतेमुळे कर्करोगाच्या पेशींचीही झपाट्याने वाढ होते.
हे सारे जाणता असे मनात येते – गोरी गोरी पान गोड साखर खरंच आपल्या आरोग्यासाठी गोड आहे का?
साखरेचे रुप दिसे जरी साजरे
पोटात जाऊन रक्तात घर करे,
पांढऱ्या चेहऱ्यावरती लोभस हसू
पण आरोग्यासाठी तुमच्या
नका त्याला फसू!
साखरेचा असे फसवा गोडवा
रोगाशीच त्याचा विचार जोडावा,
सांगू गेले लोक थोर
करू नये असंगाशी संग,
साखर जरी गोड तरी
करील आयुष्याचा रंगभंग!