शिक्षणाला सुरुवात केव्हा करावी

शिक्षणाला सुरुवात केव्हा करावी

उपनयन संस्कार व वेदारंभ संस्कार.

या संस्कारामध्ये बाळाला आध्यात्मिक ज्ञान व वेदांचे ज्ञान (म्हणजेच आताच्या युगात शालेय शिक्षण) देणे यांचा समावेश होतो.

उपनयन संस्कार –

या संस्कारात आध्यात्मिक ज्ञानासाठी बाळाला लहानपणापासून देवी / देवतांच्या कथा तसेच त्या कथाचें चमत्कारिक /काल्पनिक अर्थ न सांगता त्या घटनांचा व्यावहारिक अर्थ सांगावा. सकाळी व सायंकाळी कुलदेवतेला, घरातील मोठ्यांना नमस्कार करुन त्यांचे आशीर्वाद घेणे.

सकाळी उठल्यावर करदर्शन करण्यासारख्या सवयी लावणे . रामरक्षा, पसायदान यासारखे स्तोत्र हे त्यांच्या अर्थासहित शिकवावेत. दिवे लागणीला हात पाय स्वच्छ धुऊन देवासमोर शुभंकरोती सारखे श्लोक म्हणणे शिकवावे.

वेदारंभ संस्कार –

 म्हणजे शालेय शिक्षणाची सुरवात होय. शालेय शिक्षण हे योग्य त्या वयोगटातून सुरु करावे.

शुभदिवशी शाळेत नाव दाखल करुन गुरुजनांचे आशिर्वाद घ्यावेत. शालेय शिक्षण हे पुस्तकापुरते मर्यादित न ठेवता त्याचा व्यावहारिक उपयोग कसा करावा याचे ज्ञान द्यावे. पालकांनी आपल्या मुलांची शालेय प्रगती पाहण्यासाठी घरी उजळणी घ्यावी.

शाळेत मिळणाऱ्या गुणांवर बालकाचे आकलन न करता त्याच्यातील इतर गुणांचाही विचार करावा व त्या कलाने घडवावे. संगीत, चित्रकला, क्रिडा, अभिनय, यासारख्या अंगांचाही समावेश अभ्यासक्रमासोबत करावा.