व्हायरल इन्फेक्शन| सांधेदुखी आणि आयुर्वेद उपचार | Viral Infection

सांधेदुखी आणि आयुर्वेद उपचार | Viral Infection

सध्या व्हायरलइन्फेक्शन होऊन सांधेदुखीअसंख्य रुग्णांना होताना दिसत आहेत. चिकुनगुनिया, संधीवातसारख्या टेस्ट करून त्याही निगेटिव्ह येताना दिसतात. औषधे घेतली जातात, थोडे बरेही वाटू लागते.

पण ठराविक प्रमाणातच बरे वाटते. महिना, दोनमहिनेऔषधेघेऊनहीफारफायदावाटतनाही. मग हे असंच दुखंत रहाणार हे गृहीत धरून आहे ते सहन करत राहिले जाते.

आपणयासाठीआयुर्वेदात उपचार आहेत कायाचा फारसा विचारही करत नाही. युट्यूबवरयासंबंधी काही उपाय आहेत का हे सर्च करतो.

घरगुती उपाय सांगणारे व्हिडिओ पाहून काही बरे वाटते का ते प्रयोग करतो पण बहुतेक वेळा हाती काही लागत नाही.कसे लागेल? कारणएवढ्या वरवरच्या उपाययोजना करुन बरे होण्यासारखा हाआजार नाही हेआधी लक्षात घेतले पाहिजे.

आधी अशा तापात सांधेदुखी का होते हे समजून घेवू. ज्यावेळी ताप येतो त्यावेळेस आपल्याला भूक कसलीच नसते, तापाचाअशक्तपणाअसतो.भूक नाही याचा पहिलाअर्थ शरीराला आता काहीही गरज नाही. दुसरा अर्थ म्हणजे भूक नसल्याने शरीरात एक प्रकारचा नपचलेला भाग तयार झालेला असतो.

तो भाग थोड्या प्रमाणात असतो आणि त्यामुळे आपल्या त्वचेच्या ठिकाणी साचून घाम येणे बंद केले जाते आणि तापवाढवला जातो.

त्यामुळेचआपण ताप कमी झालाआहेका हे विचारताना घामआला होता का हेही पहातो.

घाम आला याचा अर्थ साठलेला भाग घामावाटे बाहेर पडला. पण जर हा नपचलेला भाग जास्तअसेल तर तो साठण्यासाठीआणखी जागा शोधू लागतोआणि मग ते मोकळ्या जागेत म्हणजेच सांध्यांच्या ठिकाणी साठू लागतो.

साठल्या नंतर मग लक्षणे दिसू लागतात.सांधेदुखणे,सांधेसुजणे,आखडणे,हाताचीमुठआवळतानयेणे, अंगात बारीक कसर रहाणे दिवसभर फ्रेश न वाटणे, काहिंना ढग दाटून आले की सांधेदुखी वाढते अशा प्रकारची लक्षणे दिसतात.

यावर उपाय म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात.

लेप,तेल लावूनही फारसा उपयोग होत नाही. कारण नेहमी दिसणारी सांधेदुखीआणि यात मुळातच फरकआहे.

यासाठी आतून औषधे जाणे फार गरजेचे आहे. तापाचा असा सांध्यांवर झालेला परीणामआयुर्वेद उपचारांनी चांगल्या प्रकारे घालवता येतो. आयुर्वेद उपचारांच्या बाबतीत हा एक मोठा गैरसमज आहे की,बरे वाटायला फार वेळ लागतो.

पण आपण आयुर्वेद उपचार घेण्यासाठीच मुळात वेळाने वैद्यांकडे जातो ही गोष्टआपण लक्षात घेत नाही. त्यामुळेअशाआजारात वेळ न घालवता लवकरात लवकरआयुर्वेद उपचार सुरू केले तर फरक ही लवकर पडतो.