लेहनास अयोग्य बालस कोणते? याचेही वर्णन आचार्यांनी आयुर्वेदीय ग्रंथामध्ये केले आहे ते पुढीलप्रमाणे ..

१) ज्या बालकाचा अग्नी मंद आहे (भूक कमी आहे) व ज्याला निद्रा अधिक आहे.

२) जे मलमुत्राचा अधिक प्रमाणात त्याग करते

३) जे बालक अजीर्ण व्याधीने पीडित आहे व अतिशय जड दुधाचे सेवन करत आहे.

४) ज्या बालकाची आई पथ्यापथ्य याचा विचार न करता सर्व चविंचे सेवन करते

५) जे बालक ऊर्ध्वजत्रूगत व्याधींनी म्हणजे मानेच्या वरच्या भागातील व्याधींनी तसेच जुलाब, ताप अशा व्याधींनी पीडित आहे

६) तसेच कावीळ, सूज येणे, हृद्रोग, खोकला, दमा, पोट गच्च होऊन फुगणे, उलटी अशा व्याधींनी पीडित बालक असेल तर लेहन देऊ नये

७) जेवणानंतर लगेच लेहन देऊ नये.

लेहना मध्ये कोणकोणते घटक द्रव्य असतात ?

लेहनामध्ये मुख्यतः बुद्धिवर्धक औषधांनी सिद्ध केलेले देशी गायीचे तूप, मध व सुवर्ण भस्माचा वापर केला जातो किंवा सोने दगडावर किंवा सहाणेवर उगाळून त्यासोबत मेध्य म्हणजे बुद्धिवर्धक औषधांनी युक्त देशी तुपाचा व मधाचा वापर केला जातो. लेहनामध्ये हे देण्याच्या अवलेहाचे प्रमाण बालकाच्या वयानुसार वेगवेगळे असते. त्यामुळे योग्य त्या वैद्यांचा सल्ला घेऊन बालकांमध्ये लेहन संस्कार केला तर त्याचा फायदा त्या बालकांची रोगप्रतिकारक्षमता व शारीरिक आणि मानसिक विकास होण्याकरीता अत्यंत चांगल्या रीतीने होतो.

पुढील लेखात पाहू लेहनाचे फायदे!