भारतीय संस्कृतीतील दूधाचा प्रवास | कॅल्शियम पुरवणारे पदार्थ

Cow’s milk, adulteration in milk, milk adulteration, chemicals in processed milk, side effects of packed milk, chemicals in packed milk, pure milk, A-1 A-2 milk

दूधाच्या मूळ प्रकृतीत दूध घरोघरी पोहोचेपर्यंत होणारा बदल

आपण आधीच्या लेखात दुधाचा गोठ्यापासून घरापर्यंतचा दोन प्रकारे होणारा प्रवास पाहिला.

गायी – म्हशी – शेळी ह्यांच्या धारा काढल्यानंतर दूधाची मूळ प्रकृती तीन तासांपर्यंत आहे तशीच राहते. दूधामध्ये विपुल प्रमाणात प्राणशक्‍ती असते. प्राणशक्ती अर्थात् बायोएनर्जी! तीन तास दूधातील प्राणशक्ती आहे तशीच १००℅ टिकून राहते. तीन तासामध्ये जर दूध गरम केले तर ही प्राणशक्ती आहे तशीच टिकून राहते.

असे दूध बाहेरच्या वातावरणानुसार एक ते दोन दिवस व्यवस्थित टिकून राहते. तीन तासाच्या आत दूध गरम केले नाही तर तीन तासानंतर दुधाची मूळ प्रकृती बदलण्यास सुरुवात होते. त्यामुळे दूध काढून झाल्यानंतर जितक्या लवकर होईल तितके लवकर दूध गरम करणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे पूर्वी धारा झाल्या की लगेच दूध घरोघरी वाटले जात होते.

भारतीय वंशाच्या देशी गायीचे – म्हैशीचे- शेळीचे दूध हे सर्व शरीराचा थकवा दूर करणारे शरीरातील प्रत्येक पेशीला बल पुरवणारे असा संपूर्ण आहार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. दूध हे शरीराची वाढ होण्यास आणि झीज भरून काढण्यात सर्वोत्तम आहे.

दूधामध्ये मुख्यतः प्रोटिन (प्रथिने) आणि स्निग्ध पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. तसेच जीवनावश्यक कॅल्शियम सारखे पोषकतत्व, जीवनसत्वेही असतात. असे दूध गोठ्यातून लगेच घरी गरम केले असता दूधातील पूर्ण अंश आहे त्या स्वरूपात टिकून राहतो. आणि त्यामुळे तसे दूध शरीराला संपूर्ण लाभ करून देते.

परंतु सध्या परिस्थिती अतिशय निराळी आहे आणि तितकीच भयंकर आहे कसे ते पाहू.

आधुनिक जीवनशैली आणि औद्योगिकीकरण यामुळे दूध गोठ्यातून घरी न येता पहिले ते डेअरी आणि मिल्क फॅक्टरीमध्ये जाते. तबेला व्यवसायात दूध जास्त यावे यासाठी गाई-म्हशींना हॉर्मोन्स सारखी औषधे दिली जातात हे तर सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे ती हार्मोन्स दुधामध्ये सुद्धा उतरतात आणि आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

तसेच दूधातील सायीच्या रूपातील स्निग्ध अंश ( फँट ) काढून घेतला जातो आणि तो तूप स्वरुपात विकला जातो. त्यामुळे आपल्याला जे दूध येते त्या दुधामध्ये नैसर्गिक दूधात असलेल्या स्निग्धांश हा अतिशय कमी प्रमाणात असतो.

हा स्निग्धांश काढून घेतल्यानंतर दूध घट्ट दिसावे यासाठी दूधामध्ये घातक रसायने सुद्धा मिसळली जातात.

तसेच हे दूध खराब होऊ नये यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड, सोडियम लॉरेल सल्फेट रसायने मिसळतात. हि रसायने कँसरसारखे रोग होण्यास कारण आहेत.

आज भारताची परिस्थिती पाहता लोकसंख्या किती आहे तितक्या प्रमाणात आपल्याकडे गाई-म्हशी उपलब्ध नाहीत. गाई म्हशींची संख्या कमी आहे. परिणामी उपलब्ध होणारे दूध आणि विक्री होणारे दूध यामध्ये अतिशय तफावत आहे.

तरीही एवढ्या प्रचंड लोकसंख्येला दररोज दूध पुरवठा होतो तो कसा होतो ? कुठून होतो ? त्यासाठी काय केले जाते? हे प्रश्न सर्वांच्या मनात येणे ही काळाची गरज आहे. कारण आज आपल्याला जे दूध मिळत आहे त्या दुधामध्ये भारतातील गाई, म्हशी ह्यांच्या दूधासोबत परदेशातील दूध देणाऱ्या जनावरांचे दूध पावडर मिसळले जाते.

त्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात मिल्क पावडर आयात केली जाते. ही परदेशी मिल्क पावडर आपल्या येथील दुधामध्ये मिसळून दूध वाढवले जाते आणि असे दूध घरोघरी पोचवले जाते. त्यामुळेच भारताची लोकसंख्या इतकी जास्त असूनही आणि दुधाची उपलब्धता कमी असूनही दररोज सर्वांना दूध पुरवठा होऊ शकतो.

आज भारतात देशी गायींची संख्या अतिशय कमी आहे।. बाजारात मिळणारे गायीचे दूध हे भारतीय गायीचे नसून ते विदेशी गाईंचे दूध , आयात केलेल्या दूध पावडरचेच असते. विदेशी गायीच्या दूधात ए -1 हे शरीरास हानिकारक प्रोटीन असते. म्हैशींची भारतातील संख्याही लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नाही. परिणामी म्हैशीच्या दूधातही भेसळजन्य परिस्थिती आहेच.

अशारीतीने आपणाला जे दूध मिळते त्या दूधामध्ये गाई-म्हशी यांना दिलेले हॉर्मोन्सचे दुष्परिणाम, दूध टिकून राहण्यासाठी मिसळलेली घातक रसायने, दूध घट्ट होण्यासाठी मिसळलेली रसायने, तसेच परदेशातील जनावरांच्या दूधाची पावडर हे सर्व आपण त्या दुधामधून घेत असतो.

त्यामुळे दुधाची मूळ प्रकृती ही शिल्लकच राहत नाही. मूळ दूधातील स्निग्धांश घेऊन तेही तूप म्हणून विकले जाते. हे कटु सत्य वाचनास अतिशय धक्कादायक आहे. अनेकांना हे माहीतही असेल. पण इथे एक विषय विचार करायचा आहे की दूधाचे हे सत्य इतके भयंकर असताना आपल्या मुलांना दूध देताना आपण अतिशय जागरूक असले पाहिजे.

यासाठी आपण काय बदल करु शकतो ते पाहूयात पुढच्या लेखात!