ओल्या मातीला हाताचा आधार |
तेव्हाची घेईल घडा आकार |
बाळाच्या मनावर करु संस्कार |
सुसंस्कृत रुप मग होईल साकार ||
भारतीय संस्कृतीमध्ये संस्कारांना खूप महत्त्व दिले गेले आहे. लहानपणापासून ज्या संस्कारात मुले मोठी होतात त्यावरूनच त्यांच्या आयुष्याच्या प्रगतीचा आलेख चढता राहिल की उतरता राहतो हे ठरते. प्रत्येकाला आपल्या मुलांची प्रगती चांगलीच व्हावी असे वाटते यासाठी त्यांच्यावर हे संस्कार होणे गरजेचे होय. पूर्वीच्या काळातले संस्कार हे आजही आपण ‘बारसे’, ‘कान टोचणे’, ‘जावळ’, ‘वाढदिवस’ अशा नावांनी ओळखले जातात. संस्कार म्हणजे मूळ प्रकृतीत बदल न करता चांगल्या गुणांची वाढ करणे.
संस्कार खालीलप्रमाणे –
५) चुडाकर्म (मुंडण) संस्कार
प्रसुतीनंतर करण्यात येणारा यातील पहिला संस्कार म्हणजे जातकर्म संस्कार – बाळाच्या जन्मानंतर त्याच्या आरोग्यासाठी / स्वास्थ्यासाठी जे काही आवश्यक कर्म करतात त्याला जातकर्म संस्कार म्हणतात. बाळाच्या पोषणाचा विचार करुन या संस्कारात सोने, महत्त्वपूर्ण औषधींनी सिद्ध केलेले तूप, मध चाटवले जाते. मध हा कफ दूर करणारा आहे व सोने, हे जंतुघ्न (कृमींचा नाश करणारे) आहे तसेच हे सर्व व सिद्ध तूप बुद्धीच्या विकासासाठी, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी, पचनाची शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी आहे. यामुळे मुलांचे माईलस्टोन डेव्हलपमेंट (वाढीच्या दरम्यानचे टप्पे) चांगले होतात. यालाच सुवर्ण प्राशन संस्कार असेही म्हणतात. या संस्कारामुळे बालकांचा वर्ण तेजस्वी होतो. 6 महिने सलग सुवर्ण प्राशन करणारे बालक हे श्रुतधर (म्हणजे एकदा ऐकलेले लक्षात ठेवणारा) होते, त्याची स्मरणशक्ती खूप चांगल्या
पद्धतीने वाढते. तुपाच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तूप हे blood brain barrier cross करते… आणि याचा पण उपयोग brain development साठी चांगला होतो. बाळाच्या जन्मापासून ते सहा महिन्यांपर्यंत सुवर्णप्राशन द्यावे. हे नाही जमले तरी पुढे जाऊन ते १२ व्या वर्षापर्यंत देऊ शकतो. आपल्या संस्कृतीत बाळ जन्माला आल्यानंतर सोने भेट म्हणून दिले जायचे, त्यामागे सुवर्ण प्राशन हाच उद्देश होता. आणि आयुर्वेदिक पद्धतीने नैसर्गिक लसीकरण ह्या संस्कारामार्फत होत होते. त्यामुळे जवळच्या वैद्यांकडून आपणही आपल्या बाळासाठी सुवर्ण प्राशन संस्कार अवश्य सुरू करा. सुवर्ण प्राशनला धरुन लेहन संस्कारबद्दल सविस्तर माहिती यापुढील लेखात येईल.