
चला तर आज आपण लहान मुलांची पोट का दुखते पाहूया ( बाळाचे पोट साफ होण्यासाठी ) प्रौढ व्यक्तीप्रमाणेच लहान मुलांना देखील पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. स्तनपान करणाऱ्या बाळाला होणाऱ्या पोटाच्या समस्या या आईच्या आहाराच्या प्रकारामुळे होत असतात.
जर आईने बाळ अंगावर पीत असताना आहाराची काळजी घेतली नाही तर त्याचे परिणाम बाळाच्या तब्बेतीवर होण्याची शक्यता असते.
तसेच वरचे अन्न घेऊ लागल्यावर मुलाच्या आहारात तंतुमय पदार्थांचा अभाव, पाणी किंवा आहारातील द्रवयुक्त पदार्थांचा कमतरता कारणीभूत असते.
बाळाची पोटदुखी कशी ओळखावी :
तान्ह्या बाळाला पोट दुखतं हे सांगत येत नाही त्यामुळे त्याला काही झालं की ते रडतं.
जर बाळ रडत असेल, काही दूध प्यायला तयार नसेल, बाळाचे पोट फुगलेले दिसत असले, पोटाला हात लावला असता रडणे वाढत असले तर बाळाचे पोट दुखते आहे असे समजावे.
बाळाच्या पोट दुखीवर उपाय काय ?

1. बाळाचे पोट दुखत असल्यास हिंग घालून कोमट लेप बाळाच्या बेंबीभोवती लावावा. हिंगाप्रमाणेच डिकेमालीचा लेप लावल्यास बाळाच्या पोटातील गॅसेस मोकळे होऊन पोट दुखायचे कमी होते.
२. ओव्याचे चूर्ण पाण्यात कालवून बाळाच्या पोटावर लेप केल्यास पोट दुखणे कमी होते.
बाळाच्या पोटावर हलका शेक करण्यानेही बहुतेक वेळेला पोट दुखायचे लगेचच थांबते. यासाठी गरम तव्यावर सुती हातरूमाल गरम करून, चटका बसणार नाही याची खात्री करून बाळाचे पोट शेकावे.
आई चा आहार कसा असावा :
आईने आहार हलका ठेवावं वातूळ पदार्थ टाळावे. उकळून कोमट केलेलं पाणीच प्यावे व जेवणानंतर ओवा, बडीशेप, बाळंतशेप, जिरे, सैंधव यांचे मिश्रण मुखशुद्धीप्रमाणे खावे किंवा चूर्ण करून गरम पाण्याबरोबर घ्यावे.
लहान बाळातील बद्धकोष्ठता कशी ओळखावी :
अगदी तान्ह्या बाळाला सुरुवातीला दिवसातून ७-9 वेळा पातळ शौचाला होत असेल तर ते नैसर्गिक असते.
पण हळूहळू त्याच्या पचनसंस्थेचे कार्य व्यवस्थित सुरु व्हायला लागले की घट्ट किंवा घट्टसर शी होणे अपेक्षित असते. याबाबत बाळाच्या तब्बेतीनुसार डॉक्टरांकडून माहिती करून घ्यावी.
मुलांना रोज कमीत कमी १-3 वेळा शी व्हायला हवी. रोज पोट साफ होत नसल्यास, खडा होत असल्यास किंवा बाळाला शी करायला जोर लावावा लागत असेल तर पुढील उपाय करावे
१. बाळाच्या पोटावर एरंडेल तेल हलक्या हाताने चोळावे.
२. 8-10 काळ्या मनुका कोमट पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी बाळाला पाजावे.
३. आईच्या आहारात साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश असावा.
४. गरम पाणी पुरेशा प्रमाणात प्यावे. ते. “शी’च्या जागी बोटाने एरंडेल तेल लावावे.
या उपायांनी देखील बाळाला शी करताना त्रास होत असल्यास (constipation in babies in Marathi) डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दिवसातून कमीतकमी एकदा किंवा दोनदा शी न झाल्यास असे एक दिवसापेक्षा जास्त वेळा झाल्यास डॉक्टरांना संपर्क करणे आवश्यक असते.
Must Read :
बालकांसाठी लेहन (चाटण) संस्कार ( भाग १)
बालकांच्या अभ्यंगाचे (मसाज) महत्व
सहा महिने ते दोन वर्षातील बाळाचा आहार कसा असावा.