
लेहनाचे फायदे
लेहनामध्ये हे सुवर्णाचा उपयोग करत असल्यामुळे हे मेधा म्हणजेच बुद्धीवर्धक असून अग्नी व बल यांची वृद्धी करणारे आहे. हे आयुष्य वाढवणारे आहे हे कल्याणकारक आहे. पुण्यकारक आहे. वृष्य म्हणजेच वाजीकर आहे. शरीराचा वर्ण सुद्धा सुधारणारे आहे. सुवर्ण प्राशनाने एका महिन्यात बालक बुद्धिवान होते. बालक व्याधीग्रस्त होत नाही. त्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
सहा महिन्यात बालकाची स्मरणशक्ती इतकी तीव्र होते की बालकाने कोणतीही एकदा ऐकलेली गोष्ट त्याच्या स्मरणात राहते म्हणजेच बालक एकपाठी होते.लेहनामुळे बालकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच मेंदूची एकाग्रताही वाढते मनाच्या व मेंदूच्या ठिकाणी असणारी चंचलता दूर होते. त्वचेचा रंग उजळतो व अन्नाचे पचन चांगले होते. भूक चांगली लागते व अशक्त बालके सशक्त होतात. लहान मुलांच्या मध्ये असणारी ग्रास्पिंग पॉवर व रिकॉलिंग पॉवर चांगली वाढते. बालकांचा शारीरिक व मानसिक विकास चांगला होऊन बालके चपळ बनतात.
लेहन संस्कार कधी व कोणास करावा
साधारणतः जन्मलेल्या बाळापासून सोळा वर्षे वयापर्यंत लेहन संस्कार केला जातो. बालकाच्या वयानुसार या लेहन मधील घटकद्रव्या मध्ये बदल करणे अपेक्षित असते .लेहन संस्कार शक्यतो सकाळी उपाशी पोटी किंवा सकाळी लवकर करावा भोजनोत्तर लेहन संस्कार करणे शक्यतो टाळावे.
अशाप्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने जर लेहन संस्काराचा वापर केला तर त्याचा फायदा त्या बालकांना खूप उत्कृष्ट प्रकारे होऊन त्यांचा शारीरिक मानसिक व मनोवैज्ञानिक अशा सर्व प्रकारचा विकास फार उत्तम होतो.