अन्न संस्कार-
पूर्वीपेक्षा आज अन्नपदार्थातून रासायनिक पदार्थ जास्त प्रमाणात आपल्या शरीरात जातात. त्या रसायनांचा आरोग्याच्या दृष्टीने विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. एका बाजूला आपण बाळाला खूप पौष्टिक आहार देत असतो आपणही घेत असतो आणि दुसऱ्या बाजूला जर शरीरात रसायने जात असतील तर आपल्या सोबत त्या बाळाचे स्वास्थ्य ही आपल्या अपेक्षेप्रमाणे विकसित होणार नाही. त्यासाठी आपण इथून पुढील काही लेखांमध्ये आहारातून जाणाऱ्या रसायनांचा (chemicals) विचार करणार आहोत.
आज धान्य-भाज्या पिकवताना chemicals चा अतिप्रमाणात वापर केला जाताना आपल्याला दिसतो. आपल्या जमिनीही chemicals मुळे दूषित झाल्या आहेत. अन्नधान्यांमधून शरीरात जाणारे chemicals आपण टाळू शकत नाही. परंतु अन्न बनविण्याच्या पध्दतीमधून काही chemicals शरीरात जाणे आपण निश्चित थांबवू शकतो. असे मुख्य घटक खालीलप्रमाणे आहेत.
१. साखर
२. चहा
३. कॉफी
४. रिफाईन्ड ऑईल
५. आयोडाईज्ड मीठ
६. पाकिटातील दूध
७. विकतचे रेडीमेड तूप
८. डालडा-वनस्पती तूप
९. दररोज पापड खाणे (त्यातून पापडखार म्हणजे costic soda खातो.)
९. दररोज लोणचं (शरीरात मीठचे प्रमाण वाढते)
१०. फ्रिझ
११. अँल्युमिनियमची भांडी
वरील एकेक मुद्दा आपण पुढील लेखांमध्ये सखोल समजून घेणार आहोत. पौष्टिक आहाराविषयी आपण जितके जागरूक असतो. तितकेच जागरूक आपणाला रसायनांविषयी ही होणे फार गरजेचे आहे जे बाळाच्या आणि मातेच्या आणि सर्वांच्याच स्वास्थ्यासाठी अतिशय महत्वाचे आहे.
पोटासाठीच चाले सारा व्यवहार
पोटासाठीच उभा सारा संसार
त्याच पोटाचा करावा थोडा विचार
भरण पचन पोषण जणू त्रिशक्तीचा अवतार!