बाळाची मराठी नावे | Marathi Baby Girl Names | janm nav kadhane

balache nav marathi list,janm nav kadhane ,mulinchi nave fancy list ,rashi varun mulanchi nave ,devanchi nave ,kark rashi mulinchi nave marathi ,mulanchi nave fancy ,modern mulanchi nave,First Names Starting with A-Z

बाळाचे नाव ठेवण्याआधी हे करा?

विल्यम्स् सेक्सपिअर म्हणाला होता, नावात काय आहे?..पण सर्व काही नावात आहे, याची प्रचिती येते. आपले नाव (baby name) आपल्या हातात नसले तरी आपल्या बाळाचे नाव काय ठेवावे, याचा विचार केला पाहिजे. नावावरून त्या बाळाचे भवितव्य ठरते. चांगले नाव बाळाची प्रगतीसाठी चांगले असते. त्यामुळे नाव ठेवताना नेहमी काळजी घेतली पाहिजे.

बारसे ( Marathi Baby Girl Names )

यालाच आपण “बारसे” असे म्हणतो. हा संस्कार (baby name) सर्वात महत्वाचा आहे. कारण याच संस्कारातून बाळाला त्याची स्वतःची ओळख म्हणजेच नाव मिळते, जे आयुष्यभर समाजात जगात त्याची ओळख बनते.

काहींच्या मते हा संस्कार १० व्या किंवा १२ व्या दिवशी करतात. यादिवशी माता व बालक यांना सुगंधित द्रव्यांनी (उटणे, चंदन वगैरे) युक्त जलाने स्नान घालावे.

Marathi Baby Girl Names | baby name

बालकास स्वच्छ वस्त्रात आच्छादित करावे. मंत्रोच्चार करुन पूर्व किंवा उत्तर दिशेला डोके ठेवून झोपवावे. त्यानंतर प्रथेप्रमाणे कुटुंबातील व्यक्तीने (बहुत करून बाळाची आत्या वगैरे मान्यवर स्रीयांनी) बाळाचे नाव ठेवावे. नाव देताना

१) नाक्षत्रिक आणि
२) अभिप्रायिक नाव द्यावे.

नाक्षत्रिक म्हणजेच नक्षत्रानुसार (rashi varun mulanchi nave) येणाऱ्या अक्षरावरुन ज्याला “नावरस नाव” असेही म्हणतात.

अभिप्रायिक (modern mulanchi nave) म्हणजे रोजच्या व्यवहारात येणारे नाव होय. योग्य ते नाव ठेवावे जेणेकरून समाजात आदराने घेतले जावे. त्याची चेष्टा होऊ नये. नावामुळे मनात सुख, आनंदाची अनुभूती व्हावी. तसेच मोठेपणी बालकाच्या मनात स्वतः च्या नावाप्रती घृणा निर्माण होऊ नये.

Marathi Baby Girl Names Starting with A – Z

नावाची सुरवात शक्यतो घोषवर्ण म्हणजेच ग, घ, ज, झ, ड, ढ, व, ध, ब, म आणि शेवट उष्णवर्ण म्हणजेच य,र, ल, व, श, ष, ह असावे असा उल्लेख आढळतो.

बालकास हाक मारण्यास सोयीस्कर व्हावे म्हणून या वर्णांचा उल्लेख शास्त्रकारांनी केला असावा.

नाव हे नक्षत्र / देवतांच्या नावाने युक्त मंगलवाचक, अर्थपूर्ण, बोधक असावे. नाव उच्चारण केल्यावर त्यामधे आशिर्वादाची झलक किंवा आशिर्वाद दिल्यासारखे वाटावे.

सध्याच्या काळात मुलांच्या / मुलींच्या नावांची (अर्थासहित) माहिती देणारे अनेक स्त्रोत (इंटरनेट, पुस्तके इ.) उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग करुनही अर्थपूर्ण, उच्चारणास योग्य नाव निवडता येईल.

नावावरच बालकाचे भविष्य अवलंबून असते. कोणत्याही व्यक्तीची त्या व्यक्तीला न पाहता पहिली प्रतिमा मनात तयार होते ती त्याच्या नावावरुन!

आज जर आपण “वीरप्पन” असा नामोल्लेख केला तर न सांगता आपल्या नजरेसमोर एक क्रूर व्यक्तीचा चेहरा नजरेसमोर येतो. पण जर “राम” म्हणाले असता एक सुसंस्कृत व्यक्ती समोर दिसते.

म्हणूनच नामकरण असे करावे की तो जगात नाव कमावेल. आपल्या मराठीत काही म्हणींवरुनच हे लक्षात येईल जसे की “नाव मोठं लक्षण खोटं” किंवा “नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा” म्हणूनच हा संस्कार महत्वाचा होय.

  1. बाळगुटी कशी द्यावी
  2. बाळगुटी म्हणजे बाळासाठी संजीवनी
  3. Marathi Baby Girl Names

नावात दडले आहे खूप काही

वेध भविष्याचा त्यात,

सांगे पूर्वजांच्या गोष्टी काही!

कर्तृत्वाने गाजवावे नाव जगतात

येईल सोन्याची झळाळी

मग नावाला माय बापाच्याही!