लाकडी घाणा जणू सोन्याचा स्पर्शच
लाकडी घाण्यावरचेच तेल वापरावे. पूर्वी लाकडी घाणा होता. आपण आधीच्या लेखातील लाकडी घाण्याविषयी ओवीही वाचली आहेच. त्या ओवीत “लाकडी घाण्याला जणू सोन्याचा स्पर्शच “ अशी अगदी समर्पक उपमा दिली आहे (Give link of blog37). पूर्वी घाण्याला बैल जुंपून तेल काढायचे. शुद्ध कच्चे तेल म्हणजेच साधारण मशीनवर काढलेले तेल असेच सर्वांना वाटू शकते.

परंतु तेलबिया बारीक होतात तो भाग लाकडी असणे गरजेचे आहे. तरच तिथे संतुलित उष्णता निर्माण होईल व योग्य दाबाने तेलबिया बारीक होऊन त्यातून तेल निघेल. तरच बीयांतील प्रथिने व मेदाम्ले संपूर्ण प्रमाणात तेलात टिकून राहतील. तेलबीयातील सर्व गुणधर्म पूर्णपणे तेलात उतरतील. गुणधर्म वाया जाणार नाहीत. म्हणूनच लाकडी घाण्याला ” सोन्याचा स्पर्श ” अशी उपमा दिली आहे. जे तेलातील सर्व गुणधर्म अबाधित ठेवते.
वर्तमान कालावधीत लाकडीघाणा हा वीजेवर चालणाराही चालू शकतो. त्यातून काढलेले तेलही आरोग्यदायी आहे. बाजारात लाकडी घाणा-तेल उपलब्ध आहे. घेताना उत्पादक कंपनी (manufactured by) असे लिहिलेले घ्यावे. वितरक कंपनी (marketed by) असे नको. जिथे तेल तयार होते त्या कंपनीत जाऊन प्रत्यक्ष मशीन पाहू शकतो. थोडेसे महाग आहे परंतु सर्वसामान्यजण नक्कीच घेवू शकतात.
कोणते तेल निवडावे?
भारतात प्रत्येक प्रांतानुसार शेंगदाणे, तीळ, खोबरे, करडई, जवस, कारळे, मोहरी, सूर्यफूल, बदाम, कारळे इत्यादी विविध तेलबिया निर्माण होतात. आपल्या प्रकृतीनुसार जे तेल जमते ते निवडावे. सर्वात सोपे म्हणजे आपण ज्या भागात राहतो त्याभागात पिकणाऱ्या तेलबियांचे तेल खावे. उदा. उत्तर भारतात मोहरीचे तेल, काश्मीर सारख्या उच्च शीतभागात तीळ किंवा बदाम तेल, समुद्रकिनारी प्रदेशात खोबरेल तेल,घाटावरील पठारी भागात शेंगदाणे तेल वापरावे.
राईस ब्रान तेल –
रक्तात मेद वाढू नये ह्यासाठी काही जण राईसब्रान तेल वापरतात. ह्या तेलातही घातक रसायने असतात. हे तेल सेवन करु नये.
सोयाबीन तेल –
सोयाबीनच्या पचनासाठी आवश्यक असे पाचक तत्व मनुष्याच्या शरीरात नाहीत. सोयाबीनमध्ये जी प्रथिने आहेत ती आपल्या शरीरात पचत नाहीत. म्हणून सोयाबीनचे तेल व सोयाबीनचे इतर पदार्थही खाऊ नयेत.
हे सर्व जाणता आपण ज्या भागात राहतो त्या भागात ज्या तेलबिया पिकतात त्यानुसार शुद्ध तेलाची निवड करून आपण आरोग्याकडे मार्गक्रमण करूयात.