उन्हाळा आणि वर्तमान महामारी [Part 2]

Will summer slow the spread of COVID-19
Will summer slow the spread of COVID-19

           घरातील ऑक्सिजनचे प्रमाणही वाढलेले राहील याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. ऑक्सिजन हा ज्वलनशील वायू आहे. तो शरीरातील दूषित पदार्थ जाळतो आणि रक्त शुद्ध करतो.  वातावरणामध्ये ऑक्सीजनचे प्रमाण जास्त असेल तर वातावरणातही रोगजंतू वाढणार नाहीत.

आता हे ऑक्सीजनचे प्रमाण आपण कसे वाढवू शकतो? देशी गायीच्या तुपामध्ये ऑक्सिजन वाढवण्याची क्षमता आहे. देशी गायीचे दोन चमचे तूप जाळले असता सोळाशे टन ऑक्सिजन निर्माण होतो जो बारा लोकांना दिवसभरासाठी श्वसनासाठी पुरतो हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.

यातून एक गोष्ट लक्षात येते की वर्तमान परिस्थितीमध्ये एक – दोन चमचे तूप एका व्यक्तीने खाल्ले तर त्याचा एकाच व्यक्तीला फायदा होऊ शकतो. परंतु  दोन चमचे तूप जाळले तर घरातील सर्वांनाच त्याचा फायदा होऊ शकतो. लेखांत श्वासाचे महत्त्व किती आहे हे पहातच आहोत. देशी गायीच्या गोवऱ्या (शेण्या ) व तूप जाळले असता  मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आपल्या घरात निर्माण होतो.

          शेण्या जाळल्यानंतर जो विस्तव (आर ) पडतो त्यावर थोडेसे मिरी, लवंग, वचा, कापूर टाकले असता छान धूरी तयार होते. ज्यामुळे रोगजंतू नष्ट होतील. “धूपन” विषयी आधीच्या लेखामध्ये आपण सविस्तर पाहिलेच आहे.

शेण्या जाळले असता राख तयार होते. ती “राख” सुद्धा शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. कारण देशी गाईचे शेण्या जाळल्यानंतर राखेत 40 टक्के ऑक्सिजन तयार होतो. ही राख पाण्यात घालून पाणी ढवळले असता त्या राखेतील ऑक्सीजन पाण्यामध्ये  अर्ध्या तासात पूर्णता विरघळतो.

आणि पाच तासापर्यंत हा ऑक्सिजन पाण्यामध्ये असतो. पाच तासानंतर मात्र पाण्यातील ऑक्सिजन हा उडून जातो. त्यामुळे शेण्या जाळल्यानंतर जी राख उरते ती  पाव चमचा राख एक ग्लास पाण्यात घालून पाणी ढवळावे. अर्धा तासानंतर ते पाणी गाळून प्यावे. असे केले असता शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

राखेतून आवश्यक खनिज ही मिळतात. हे पाणी आपण ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे त्यांना देऊ शकतो. तसेच स्वस्थ व्यक्ती सुद्धा असे पाणी घेऊ शकतात.

             ज्यांना देशी गाईचे तूप उपलब्ध होत नसेल त्यांनी कमीत कमी देशी गायीच्या शेनापासून  बनवलेल्या धूपकांडीचा तरी वापर करावा. सर्वात महत्त्वाचे तर श्वासाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

जे योगा प्राणायाम शिकलेत त्यांनी नियमित करावे आणि जे शिकलेले नाहीत त्यांनी आपल्या लेखांमध्ये जो प्रयोग सांगितला आहे तो दिवसभरात मध्ये मध्ये जरूर करावा. त्या प्रयोगाने सुद्धा शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यात निश्चितच मदत होणार आहे.

          सर्वत्र भीतीचे वातावरण असले तरी सुद्धा रोज कमीत कमी ४० – ५० मिनिटे तरी चालले पाहिजे. गच्चीवर चाललो तर मास्क घालण्याची सुद्धा आवश्यकता नाही.  गार्डनमध्ये अथवा आपल्या सोसायटीच्या आवारात आपण मास्क घालण्याचा नियम पाळून चालू शकतो. पण भीतीमुळे घरातच पूर्ण वेळ बसू नका. शरीराची हालचाल ही झालीच पाहिजे.

 शक्य होत असेल त्यांनी सकाळच्या उन्हामध्ये अर्धातास तरी वेळ घालवा. उन्हात बसून श्वासाचा प्रयोग करू शकतो. उन्हामध्ये चालू शकतो. बसून नामस्मरणही करू शकतो. सूर्याच्या उष्णतेमुळे, प्रकाशामुळे विटामिन डी शरीराला तर मिळणारच आहे. पण मनालासुद्धा ” चैतन्याचे विटामिन ” मिळणार आहे. मनातील भीतीही दूर होऊ शकते.

सूर्याकडे आपण संपूर्ण विश्वासाठी प्रार्थना केली तर संपूर्ण विश्वातील व्यक्तींचे मनोबल वाढवण्यातही आपण शांतपणे योगदान करू शकतो. छान ऊन आहे तर पाऊस सुरू होण्याआधी आपण सूर्यप्रकाशाची मदत घेवू शकतो. शरीर व मनाची बॅटरी चार्ज करू शकतो.

      मंत्र, श्लोक, स्तोत्र यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींमुळे ही वातावरणातील रोगजंतू नष्ट होतात. वातावरणात ऊर्जा वाढते.  स्वतः आपण मंत्रोच्चार जरूर करावे. तसेच घरामध्ये “मंत्रश्लोक” संगीतही लावू शकतो.आतापर्यंत अनेक जन्म घेत निसर्गातून आपण घेतघेतच आलो आहोत.

आपण निसर्गातील हवा, पाणी, वनस्पती, माती , प्रकाश घेतला आणि इतकंच नाही तर आपण प्राणीसुद्धा आपल्या चवीसाठी घेतले. आता निसर्गात थोडसं देण्याची वेळ आलेली आहे.

निसर्ग आपल्याला देऊन देऊन थकला आहे असे आपण म्हणू शकतो. अशावेळी आपल्या प्रार्थनेतून, आपल्या विचारातून  कमीतकमी सकारात्मकता तरी निसर्गात देण्याचा प्रयत्न निश्चित करू शकतो.

ज्यांना ते शक्य होत असेल त्यांनी जरुर सकाळ-संध्याकाळ किंवा दिवसातून एकदा तरी शेण्या व तूप आपल्या घरी जाळावे जेणेकरून निसर्गातील कमी झालेला ऑक्सिजन आपण पुन्हा वाढवू शकतो. तसेच आपण नकळत गोपालनामध्ये सुद्धा थोडाफार हात लावू शकतो. परिणामी आपल्या देशी गाई वाचू शकतात. देशी गाई वाचल्या तर पर्यावरण वाचेल तर आपण वाचू