ज्या दिवसापासून भारतात समुद्राच्या पाण्यापासून बनवलेले मीठ खाणे सुरू झाले तेव्हापासून उच्च रक्तदाबाने पीडित रुग्णसंख्या वाढली. सैंधव /काळे मीठ आहारात असेल तर रक्तदाब संतुलित रहातो. उच्च रक्तदाबामुळे भविष्यात अनेक आजार होतात.

उदा. ह्रदयरोग, मेंदुत रक्तस्राव,अर्धांगवायु , शिरःशूल, मुत्रपिंडावर परिणाम, सूज, डोळ्यांचे आजार इत्यादी. उच्चरक्तदाब झाला असता “मीठ कमी खा” असे सांगितले जाते. पण खरे तर मीठच बदलणे गरजेचे आहे हे सांगितलेच जात नाही. उच्च रक्तदाब आहे असे लक्षात आले असता सैंधव मीठ वापरायला सुरुवात केली तर नंतर कोणताही त्रास होणार नाही.

Rock salt, Black salt, benefits of rock salt, benefits of black salt, disadvantages of iodized salt, blood pressure and salt, use of salt in blood pressure, best salt for high blood pressure

शरीराला सैंधव व काळे मीठा पासून जी पोषकतत्व मिळतात ती जर नाही मिळाली तर अर्धांगवायु होण्यास एक महत्त्वाचे कारण ठरते. मेंदूत रक्तस्राव होउन अर्धांगवायू होतो अथवा मेंदूस रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसेल तरीही अर्धांगवायु होतो. डॉ दीक्षितांच्या गुरुंना अर्धांगवायू झाला असता त्यांनी त्यांना सैंधव व काळेमीठाचे गुणधर्म असलेले होमिओपॅथीचे औषध एक दिवसच दिले. त्यांच्या गुरुंमध्ये खूपच सुधारणा झाली. त्यांनी सांगितले की सैंधव व काळेमीठ मिसळून पाणी उकळून दिले असते तरी बरे वाटले असते. वरचा अनुभव पहाता सैंधव व काळेमीठ वापरणे किती गरजेचे आहे हे लक्षात येते.

Covid 19, Lung Strength and Ayurveda

अति मीठ सेवनाचे परिणाम-:

शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते व त्यामुळे कँल्शियम चे प्रमाण कमी होते. परिणामी हाडे, दात ह्यांच्या पेशींवर परिणाम होतो.

आयुर्वेदानुसार अति मीठ सेवनाचे परिणाम –

पित्तदोष वाढणे, रक्तामध्ये दोष साठणे, चक्कर येणे, चिडचिड होणे, केस पिकणे, केस गळणे, दात पडणे, आम्लपित्त, स्त्रियांमध्ये पाळीच्या विविध तक्रारी, अनेक त्वचेचे विकार, दृष्टीवरही परिणाम, नपुंसकता, अंगावर सूज येणे, इत्यादी

सैंधव मीठाचे गुणधर्म-:

सैंधव मीठ पचनशक्ती वाढवते, स्निग्धता निर्माण करते. हे शीतगुणाचे आहे. वात – पित्त – कफ संतुलित करते. डोळ्यांसाठी श्रेष्ठ, स्त्रीबीज-शुक्रनिर्मितीत मदत करते. शरीरावश्यक ९४ प्रकारचे सूक्ष्म पोषकतत्व सैधव मीठामुळे उपलब्ध होतात. त्यामुळे प्रत्येक पेशीचे कार्य सुयोग्य होते.

अतिरिक्त मीठाचे दुष्परिणाम जाणता आपल्या आहारातून अतिरिक्त मीठाचे सेवन कळत-नकळत होत नाही ना हे पहावे. सर्व वेफर्सचे प्रकार, फरसाण, बेकरीचे पदार्थ, लोणचे , पापड ह्यात मीठाचे प्रमाण जास्त असते.

तसेच शरीरातील पेशींना जीवनावश्यक पोषक तत्व मिळावे ह्यासाठी सैधव मीठ स्वयंपाक करण्यासाठी वापरणे गरजेचे आहे. लहान वयातच high blood pressure च्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. डोळ्यांच्या तक्रारी, हाडांच्या तक्रारी इ वाढू लागल्या आहेत. ह्या तक्रारींच्या कारणांमध्ये आयोडीनयुक्त मीठ हेही प्रमुख कारण आहे. मुलांच्या सुरक्षित आणि परिपूर्ण वाढीसाठी सैंधव मीठ वापरणे ही काळाची गरज आहे. सैंधवाचे खडे आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध असतात. ते सहज बारीक करू शकतो. डायरेक्ट सैंधव पावडर आणण्याऐवजी सैंधवाचे खडे आणून त्याची पावडर करणे जास्त हितकर आहे.

थोडीशी जागरूकता, अचूक निवड व थोडाश्या कष्टाची सवय जोपासली की आपली व आपल्या मुलांची आरोग्याकडे वाटचाल निश्चितच आहे !

समुद्राचे पाणी खारे

मीठामध्ये उतरले गुण सारे

रक्तामधले पाणी वाढून

ठिसूळ केले शरीर सारे!

संसाराचा हा रहाडगाडा

शरीर ओढते रात्रदिन सारा

जपण्यासाठी शरीर स्वास्थ्य

वेळ काढा त्यासाठी थोडा!

गोरे मीठ गोऱ्या लोकांचे देणे

फुकाफुकी रक्तभारास वाढवणे

संघटनाचा करा विचार थोडा

स्वयंपाकघरात असूदे सैंधवाचा खडा!