आयुर्वेद सांगतो | Ayurveda Marathi |ayurveda in marathi

हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम् |

मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेदः स उच्यते || (चरक)

आयुर्वेद – (ayurveda in marathi)

म्हणजे (ayurveda in marathi) असा वेद जो आयुष्याचा सर्वांगाने विचार करतो. आयुर्वेद हे असे शास्त्र आहे जे ‘आजार बरा करणे’ यासोबतच ‘आजार होऊच नये’ यावर जास्त भर देते. आयुर्वेद हे प्राचीन व शाश्वत शास्त्र आहे. आयुर्वेद हि एक जीवनशैली आहे.

आयुर्वेद सकाळी किती वाजता उठावे इथपासून ते रात्री किती वाजता झोपावे इथपर्यंत.. आणि सकाळी दात घासण्यासाठी काय वापरावे इथपासून ते जेवणात कोणता पदार्थ असावा, व्यायाम आवश्यक आहे पण कुणी, केव्हा, का आणि का नाही करायचा, कोणते पदार्थ किती खावेत, यांसारख्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यानुसार सांगतो.

ayurveda in marathi
ayurveda in marathi

आयुर्वेद आधुनिक शास्त्रांच्या परिमाणांच्या चौकटीत बसणार नाही. कारण, आयुर्वेदानुसार असंख्य लक्षणे, व्याधी असे आहेत की ज्यांचा कार्यकारण संबंध (एखादे लक्षण का निर्माण झाले) फक्त आयुर्वेदातील सिद्धांतांच्या आधारेच लावता येतो.

उदाहरणादाखल एक विचारसांगायचा म्हंटलं तर, रोजच्या धावपळीच्या जगात तुम्ही शौच्याला आले असतानाही जाणे टाळत असाल तर तुम्हाला पुढे जाऊन हृदयावर परीणाम होऊ शकतो, कंबरदुखी सुरू होऊ शकते, पोटातील अवयवांच्या ठिकाणी छोट्या मोठ्या गाठी होऊ शकतात, अगदी मेंदूच्या कार्यक्षमतेवर ही परीणाम होऊ शकतो.

हे का घडू शकते? हे आयुर्वेदातील (ayurveda in marathi language) सिद्धांताच्या आधारे कोणीही वैद्य विचार करून त्यानुसार उपचार देवून रुग्ण बरा करु शकतो.

पण आधुनिक सिद्धांताच्या विचाराने या लक्षणांचा आणि शौचाचा संबंध कसा लावणार?

आयुर्वेद (Ayurveda Marathi) उपचारांनी एका दोन मिनिटात बरे होता येतच नाही. घरगुती उपचार, हर्बल उत्पादने म्हणजे आयुर्वेद नव्हे हे समाजाला समजणे आवश्यक आहे.

आयुर्वेद उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाला सध्याच्या आजाराच्या लक्षणांसोबतच शौचाला, लघवीला साफ होते का? झोप लागते का? भूक लागते का? पूर्वी कोणते आजार झाले होते? व्यवसाय काय करता? यांसारखे मूळ सिद्धांतांवर आधारलेले असंख्य प्रश्न आजाराच्या निदानाकडे जाण्यासाठी विचारावे लागतात.

ayurveda in marathi
ayurveda in marathi

आयुर्वेदामध्ये उपचार घेण्यासोबतच, दिनचर्या,ऋतुचर्या आहाराचे नियम इत्यादी अनेक गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत.

आयुर्वेदामध्ये सांगितलेले नेमके शरीरशास्त्र, जीवनशैली, आजार, उपचार, आयुर्वेदाबद्दल असलेले समज – गैरसमज  इत्यादी गोष्टी आपण ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मांडणार आहोत