आई आणि बाळ –
मन आणि मनाची स्थिती याचाही संबंध बालकाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आईच्या मनाचे स्वास्थ्यही चांगले राहणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आईने आपले मन जास्तीत जास्त सात्विक ठेवले पाहिजे. लक्ष विचलित करणारे टीव्ही, मोबाइल यांचा कमीत कमी वापर केला जावा. मागील लेखात आईच्या आणि बाळाच्या मनाचं बाँडिंग कशा पद्धतीने होत असते हे वर्णन केलेले आहे.
– Latest Blogs –
बाळ हे सुरुवातीला आईलाच ओळखत असते, नऊ महिने आईच्या पोटात असते, त्यामुळे आईच्या मनाशी बाळाच्या मनाची नाळ ही जुळलेलीच असते. आई ज्या पद्धतीने विचार करेल त्या पद्धतीनेच त्याच्या मनाची डेव्हलपमेंट होत असते आणि बाळाचा स्वभाव तयार होत असतो. त्यामुळे आईचे मन जितके सात्विक, स्वस्थ असेल तितकेच बाळाचे मन सात्विक आणि स्वस्थ राहील.
कुणाला घरातील अडचणी असतील, जॉब वरील अडचणी असतील जी माता सतत तणावाखाली असेल त्यांचे बाळ भित्रे होण्याची, चिडचिड करण्याची शक्यता असते. म्हणून बाळ सोबत असताना या अडचणींचा विचार करूच नये. बाळाच्या मानसिक डेव्हलपमेंटसाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.

बाळाला खेळवताना, झोपवताना –
बाळाला खेळवताना, झोपवताना चांगली गाणी, अंगाई गुणगुणणे याचाही मुलांच्या मनावर चांगला परीणाम होत असतो. आई आणि आणि बाळाच्या मनाचे अशा पद्धतीने बाँडिंग झाल्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मुले मोठी होत असताना आईचे ऐकू लागतात, शक्यतो फारसा त्रास देत नाहीत. कोणतीही गोष्ट शक्यतो आईला विचारून केली जाते, आई बद्दल प्रेम आणि आदर चांगला राहतो.
अशा पद्धतीने हा बाळाच्या मनावर होणारा नकळतसा संस्कारच आहे. पुढे जाऊन चांगलं आणि वाईट गोष्टी समजण्यासाठी हा पाया आहे असेही म्हणायला काही हरकत नाही. इथे एक प्रचलित म्हण सांगावीशी वाटते, “पेराल तेच उगवेल”. याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जिजाऊ मातेने सदैव पराक्रमाचा, शूरतेचा, वीरतेचा विचार शिवरायांच्या मनात लहानपणापासून बिंबवला, त्यामुळे महाराज पराक्रमी शूरवीर झाले.