
आईच्या दुधाला पर्याय (alternative to breastfeeding)
क्षीराद या अवस्थेमध्ये आईचे दूधच (breastfeeding) बालकाचा प्रमुख आहार व संपूर्ण_आहार असल्यामुळे तिचा आहार षड्रसात्मक (सहा ही चवींनी युक्त असणारा), वेळेवर, योग्य मात्रेत घेणे गरजेचे आहे. जेणेकरून तयार होणारे दूध चांगल्या क्वालिटीचे तयार होईल.
तसेच मातेच्या आहारामध्ये खसखस, मेथी, हळीव, दूध, सुंठवडा, तूप यांचा वापर नियमित केल्यास दूध चांगल्या प्रमाणात निर्माण होऊन दुधाची कॉलिटी व कॉन्टिटी इम्प्रूव्ह झाल्यामुळे बाळाचे वजन उंची म्हणजे शारीरिक व बौद्धिक_विकास चांगला होतो.

त्याचबरोबर शतावरी कल्पाचा वापर सकाळी व सायंकाळी दुधासोबत केल्यास त्याचा परिणाम स्तन ग्रंथींवर होऊन दुधाचे गुण वाढतात.
काहीवेळा आईच्या खाण्यामध्ये जड पदार्थ, अवेळी जेवण झाल्यास ,बाळाला अपचन, जुलाब ,उलटी ,पोट गच्च होणे ,ताप यासारखी लक्षणे दिसल्यास मातेला हलका_आहार व आलेपाक, सुंठ व गुळ अशा घरगुती द्रव्यांचा वापर करावा. आयुर्वेद_सांगतो की अशा परीस्थितीत बाळासोबत आईला ही औषधे देण्याची गरज असते.
याने बाळाचे झालेले असे आजार पटकन बरे होतात. इतर औषधे देण्याची शक्यतो गरज पडत नाही.
मातेचे_दूध (breast milk)
मातेचे_दूध हेच बालकासाठी प्रशस्त असले तरी काही गुंतागुंतीच्या प्रसूती, प्रिटर्म बेबी (महीने पूर्ण भरायच्या आधी जन्म झालेली मुले) यांमध्ये, एन आय सी यु मध्ये असलेली बालके किंवा काही आजारांच्या स्थितीत आईचे दूध देता येत नाही अशावेळी आयुर्वेदात धात्रीची म्हणजे दुसऱ्या मातेचे दूध देण्याची योजना करण्यास सांगितले आहे.
मात्र त्यासाठी धात्री परीक्षा व गुण पाहायला सांगितले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे “छत्रपती संभाजी राजे” त्यांच्या धाराऊ ठरवण्यासाठी जिजाऊ मातांनी खूप स्ञियांची परीक्षा घेऊन मग धाराऊ नियुक्त केल्या होत्या.
सद्यस्थितीला मात्र मोठ्या शहरांमध्ये ब्रेस्ट मिल्क बँक आल्या आहेत ज्यामध्ये मिल्क डोनेट करणाऱ्या मातेचे वय शारीरिक स्थिती व प्रयोगशालेय परीक्षा करूनच त्यांचे दूध पाश्चराईज्ड करून तीन ते चार महिन्यापर्यंत साठवून वापरले जाते.
ज्या ठिकाणी ही सुविधा नाही तसेच नोकरदार असणाऱ्या महिला ब्रेस्टफीडिंगला पर्याय म्हणून डॉक्टरांकडे पावडरच्या दुधाची मागणी करतात ते अत्यंत चुकीचे आहे. त्याऐवजी नोकरदार महिलांनी स्वच्छ भांड्यामध्ये अंगावरचे दूध जर काळजीपूर्वक काढून दिले तर पुढे ते चार तासांपर्यंत रूम टेंपरेचरला वापरू शकतो.
याव्यतिरिक्त फॉर्मुला_फीड च्या पावडर मिळतात त्यामध्ये उकळून थंड केलेले पाणी वापरले जाते. तसेच देशी गायीचे, म्हशीचे किंवा शेळीचे दूध पाणी मिसळून बऱ्याचदा मुलांना वापरले जाते.
गाईचे_दूध-
• गाईचे_दूध गोड,शितल, स्निग्ध, प्रसन्न, रुचकर, पथ्यकर, कांती देणारे, प्रज्ञा व बुद्धी वाढवणारे, पुष्टी देणारे आहे; त्यामुळे देशी गायीचे दूध पाणी मिसळून वापरणे संयुक्तिक ठरते.
म्हशीचे_दूध-
• म्हशीचे_दूध जडपणा वाढवणारे, निद्रा आणणारे, बुद्धी मंद करणारे व गाईपेक्षा कमी गुणाचे असल्यामुळे शक्यतो टाळावे.
शेळीचे_दूध –
• शेळीचे_दूध पचायला हलके तसेच जुलाब होताना मलप्रवृत्ती बांधून ठेवणारे व खोकला, दमा ,धाप कमी करणारे असून यामध्ये इमिनोग्लोबिन जास्त प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक्षमता वाढवणारे आहे. म्हणून सर्दी ,खोकला, दमा, जुलाब, कृशता असणाऱ्या बालकांमध्ये शेळीचे दूध वापरावे.
• फॉर्मुला फीड चा वापर शक्यतो कमी करावा किंवा टाळावा.